राज्यपालांच्या वक्तव्यावर दोन्ही राजे संतप्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे महाराजांचा अपमानच केला
governor bhagat singh koshyari
governor bhagat singh koshyari sakal
Updated on

विधान मागे घ्या : उदयनराजे

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे महाराजांचा अपमानच केला आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून, राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या विधानावर खासदार उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

स्पष्टीकरण द्या : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी घडवले. महाराष्ट्रात महाराजांबाबत प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराष्ट्रात अशा पद्धतीने वक्तव्य होतेय ती चुकीची गोष्ट आहे. राज्यपालांनी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून त्यांनी असे बोलण्यामागचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि देशाचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे समाजात पडसाद उमटतात. अशा पद्धतीने काल जे वक्तव्य झाले ते चुकीचे आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.