Satara News : घरपट्टीच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका मांडली

विभागवार शिबिरे घ्‍या; आमदार शिवेंद्रसिंहराजे, बळजबरी करू नका; खासदार उदयनराजे
udayanraje and shivendra singh raje over property tax satara marathi news
udayanraje and shivendra singh raje over property tax satara marathi newsSakal
Updated on

सातारा : सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना पालिकेने बजावलेल्‍या घरपट्टी वसुलीच्‍या नोटिसांबाबत नागरिकांत संभ्रम असून, त्‍याविषयी दैनिक ‘सकाळ’ने सविस्‍तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

सातारकरांच्‍या द्दष्‍टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेत जाऊन केलेल्‍या चर्चेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना घरपट्टीतील त्रुटी दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच अनुषंगाने उदयनराजेंनीही कॅम्‍प घेण्‍याच्‍या तसेच कोणावरही घरपट्टी वसुलीबाबत बळजबरी न करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास केल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पालिकेकडून घरपट्टीच्या बजावलेल्‍या नोटिसांवरून सर्वसामान्‍यांमध्‍ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्‍यासाठी आज शिवेंद्रसिंहराजेंनीशहरातील शेकडो नागरिकांसह पालिकेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्‍याशी चर्चा केली. यावेळी त्‍यांनी घरपट्टी नोटिसांतील त्रुटी दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या.

याच अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनीही भूमिका मांडली. त्‍यांनी, घरपट्टीच्या नोटिसा आणि ती आकारणीच्‍या मुद्द्यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नागरिकांनी या अनुषंगाने आमच्‍याकडे संपर्क करत तोडगा काढण्‍याची मागणी केली होती. यानुसार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हद्दवाढ भागात कॅम्प लावण्‍याच्‍या तसेच कर भरणासाठी बळजबरी न करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

udayanraje and shivendra singh raje over property tax satara marathi news
Property Tax : पुणे महापालिकेचे मिळकतकराचे ८४०० कोटी थकीत

शहरातील शेकडो नागरिकांसह पालिकेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्‍याशी चर्चा केली. यावेळी त्‍यांनी घरपट्टी नोटिसांतील त्रुटी दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनीही भूमिका मांडली.

त्‍यांनी, घरपट्टीच्या नोटिसा आणि ती आकारणीच्‍या मुद्द्यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नागरिकांनी या अनुषंगाने आमच्‍याकडे संपर्क करत तोडगा काढण्‍याची मागणी केली होती. यानुसार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हद्दवाढ भागात कॅम्प लावण्‍याच्‍या तसेच कर भरणासाठी बळजबरी न करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

विभागवार शिबिरे घ्‍या : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना देण्‍यात आलेल्‍या घरपट्टीच्‍या नोटिसा चुकीच्‍या पद्धतीने करण्‍यात आल्‍याच्‍या आक्षेपांची दखल घेत त्‍याबाबत शंका, प्रश्‍‍नांचे निराकरण करण्‍यासाठी विभागावर शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना केल्‍या होत्‍या. यानुसार अशी विभागवार शिबिरे घेण्‍याची कार्यवाही करण्‍याबरोबरच विस्तारित भागातील नागरिकांना आवश्‍‍यक त्‍या सुविधा तत्‍काळ पुरविण्‍याचे आश्‍वासन यावेळी श्री. बापट यांनी उपस्‍थितांसह शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

यावेळी ‘नविआ’चे माजी नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्‍हाण, अशोक मोने, अमोल मोहिते, जयवंत भोसले, शाहूपुरी आघाडीचे भारत भोसले, अक्षय जाधव, आशुतोष चव्‍हाण यांच्‍यासह इतर पदाधिकारी तसेच शहरासह विस्तारित भागातील नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘प्राथमिक सुविधा न पुरवता पालिकेने अन्‍याय केल्‍याची भावना हद्दवाढ भागातील नागरिकांच्‍यात निर्माण झाली आहे. त्‍यातच शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना आता घरपट्टीच्या नोटिसा पाठविण्‍यात आल्‍या आहेत.

घरपट्टी आकारणीसाठीची पाहणी सदोष असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. विसावा नाका येथे दोन मिळकती समान आहेत. यातील एका इमारतीची घरपट्टी दोन लाख आणि दुसऱ्या इमारतीची घरपट्टी चार लाख आली आहे.

udayanraje and shivendra singh raje over property tax satara marathi news
Satara Crime : आंधळीत डबल मर्डर; चुलत भाऊ-भावजयचा निर्घृण खून संशयितास अटक

कमी-जास्‍त प्रमाणात सर्वच नागरिकांना असाच अनुभव आला आहे. बांधकाम क्षेत्रापेक्षाही जास्‍त घरपट्टी आकारल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.’’ नागरिकांनी भावना पालिका प्रशासनाकडे मांडण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

यानुसार शहरासह विस्तारित भागातील महिलांनी घरपट्टीबाबतचे आक्षेप हरकती श्री. बापट यांच्‍यासमोर मांडल्‍या. यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी, घरपट्टीबाबत शंका, प्रश्‍‍न दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे आयोजित करण्‍याचे तसेच त्‍यातील सूचना, त्रुटी जाणून नागरिकांना बिल दुरुस्‍ती करून देण्‍याची कार्यवाही करण्‍याची मागणी केली.

यानुसार कार्यवाही न करता घरपट्टी वसूल करू नये. आम्‍ही तशी घरपट्टी भरणार नाही व त्‍याविरोधात आंदोलन छेडण्‍याचा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला. यानुसार श्री. बापट यांनी, नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्‍यासाठी विभागवार घरपट्टीबाबत सुनावणी घेण्‍याचे आश्‍‍वासन दिले.

udayanraje and shivendra singh raje over property tax satara marathi news
Satara : भारतमातेच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आबालवृद्ध एकवटले

लोकांच्या शंकांचे निरसन करा : उदयनराजे

सातारा विकास आघाडीवर टीका करत नागरिकांमध्ये संभ्रम तयार करण्‍यात येत आहे. आम्‍ही अशा आरोपांना भीक घालत नसल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उदयनराजे म्हणाले, ‘‘घरपट्टीच्या नोटिसांबाबत नागरिकांच्‍यात संभ्रम आहे. त्‍याबाबत तोडगा काढण्‍याची नागरिकांची मागणी होती.

त्यानुसार हद्दवाढ भागात कॅम्प लावून घरपट्टीबाबत लोकांच्या शंकांचे निरसन करा, तसेच कर भरण्यासाठी कोणालाही बळजबरी करू नका, असा सूचना पालिका मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत.’’ विविध योजना, त्‍यातून मिळालेला निधी, त्‍यातून मार्गी लागलेल्‍या विकासकामांची माहिती देण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.