सर्वांनी जबाबदारीने वागा : उदयनराजे

नागरिकांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करत इतरांची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी पत्रकात केले आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : कोणत्याही सबबी न सांगता गेली दीड वर्षे सातारा नगरपालिका (satara muncipal council) नागरिकांच्या आरोग्य (health) सेवेसाठी कार्यरत असून, यापुढील काळात पालिकेबरोबरच सातारकरांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी केले आहे. कोरोनाकाळात (coronavirus pandemic) नगरपालिकेने स्वखर्चातून आजपर्यंत 2 हजार 800 जणांवर अंत्यसंस्कार केल्याची माहितीही त्यांनी दिली. (udayanraje-bhosale-appeals-citizens-take-care-in-covid19-pandemic-satara-trending-news)

कोरोना (corona) व लॉकडाउनमुळे (lockdown) जनजीवन ठप्प असतानाही सातारकरांच्या आरोग्यासाठी पालिकेचे सर्व विभाग आरोग्य सेवेसाठी अविरत कार्यरत आहेत. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना राबवत असतानाच पालिकेने नागरिकांना आधार देण्याचे काम केले आहे. लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या छोट्या व्यावसायिकांना मदतीचा हात देतानाच शहराचे आरोग्य अबाधित राखत नागरिकांच्या सोयीसाठी दोन लसीकरण केंद्रे सुरू केली.

Udayanraje Bhosale
काेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर
Udayanraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय ?

कामासाठी सतत झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात सातव्या वेतन आयोगाची रक्कम प्रदान करण्याची कार्यवाही पालिकास्तरावर करण्यात येत आहे. कोरोना काळात विविध ठिकाणी उपचार घेत असताना मृत झालेल्या सुमारे 2 हजार 800 जणांवर पालिकेने स्वखर्चातून अंत्यसंस्कार केल्याचेही उदयनराजेंनी नमूद केले आहे. नागरिकांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करत इतरांची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()