कऱ्हाड (सातारा) : 'आरसा' हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावं, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचं उत्तर आपोआप मिळेल, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) संजय राऊत यांना त्यांचं नाव न घेता लगावला.
विधिमंडळात या बनावट शिवसेना आमदारांच्या रूपानं चाळीस चोरांचं मंडळ आहे. या लोकांनी आपण कितीही शिवसेना असल्याचा आव आणला तर राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही.
शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्तानं कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर खोचक शब्दांत टीका केली. विधिमंडळ (संसदीय) पक्ष म्हणजे शिवसेना नव्हे, अशा शब्दांत शिंदे गटावर निशाणा साधत खासदार राऊतांनी राज्यात सध्या विधिमंडळ नसून चाळीस जणांचं चोरमंडळ आहे, असा टोला लगावला.
विधीमंडळातील पक्ष म्हणजेच, शिवसेना (Shiv Sena) असं काही जण म्हणत असतील तर ते खोटे आहे. ते तर बनावट शिवसैनिक आहेत. विधिमंडळात या बनावट शिवसेना आमदारांच्या रूपानं चाळीस चोरांचं मंडळ आहे. या लोकांनी आपण कितीही शिवसेना असल्याचा आव आणला तर राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण, अशी अनेक पद आम्हाला पक्षानं आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. ती पदं आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदं गेली तर परत येतील. पण, आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असंही खासदार राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हे हजारमाची (ता. कऱ्हाड) इथं आयोजित बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरणासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरसा हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला लागू होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावं, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचं उत्तर आपोआप मिळेल, असा खोचक टोला उदयनराजेंनी संजय राऊतांना लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.