सातारा : सध्या मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण ढवळू लागलं आहे. त्यातच आता निसर्गाचा आणि समाजाचा समतोलही ढासळत चालला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले, त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले आहे. (Udayanraje Bhosale Criticizes MLA And MP Over Maratha Reservation Satara Political News)
कुठली जात कुठली पात, यामुळेच लहानपणाचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. त्यांच्या या गुणांमुळेच आंदोलन-बिंदोलन फालतूगिरी असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का?, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, कोणी कोणालासोबत घेऊन लढायचे ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मी तर एकटाच लढतोय. निवडणुकीऐवजी स्पर्धा ठेवली, तर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. या लोकांना मतदारांची गरज आहे. पण, काही प्रश्नांवर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना विचारा, आपण काय केले पाहिजे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत लोकांचे मत विचारात घेतात. निवडून आल्यानंतर आपले मत लोकांना सांगायचे असते. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या चार, पाच किंवा सहा तारखेला पाऊस हमखास पडणार म्हणजे पडणारच. त्यावेळी निसर्गाचा आणि समाजाचा समतोल व्यवस्थित होता. पण, आता निसर्गासह समाजाचाही समतोल ढासळलेला आहे.
माझे ठाम मत आहे की, या समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले आहे. तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. ज्यांनी निवडून दिले त्या समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी यांची आहे. पण, आता कोण या जातीला जवळ करतोय कोण त्या जातीला जवळ करतोय. कुठली जात कुटली पात, यामुळेच लहानपणाचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. त्यांच्या या गुणांमुळे आंदोलन बिंदोलन फालतूगिरी आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनी काही केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी जाब विचारला पाहिजे, अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे रोखठोक मत उदयनराजेंनी मांडले.
Udayanraje Bhosale Criticizes MLA And MP Over Maratha Reservation Satara Political News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.