साता-यात पहिले पाढे पंचावन्न; उदयनराजेंची डाेकेदुखी वाढणार?

साता-यात पहिले पाढे पंचावन्न; उदयनराजेंची डाेकेदुखी वाढणार?
Updated on

सातारा : विकास आघाडीतील गटबाजीने पालिका निवडणुकीच्या तोंडावर जोर धरल्याने एकमेकांच्या कार्यक्रमांना गैरहजर राहण्याचे प्रकार नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडून सुरू आहेत. या बेबनावाची चर्चा पालिकेत सुरू असून, त्याला दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांकडूनही दुजोरा मिळत आहे. 

सातारा पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या पूर्ततेवर जोर दिला आहे. गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी, असा नारा देत उदयनराजे साताऱ्यात गटबांधणी करत आहेत. ते गटबांधणीत व्यस्त असतानाच सातारा विकास आघाडीतील गटबाजी उफाळल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नगरसेवक वसंत लेवे यांनी साविआ पर्यायाने आरोग्य विभागाच्या कारभारावर सर्वसाधारण सभेत सडकून टीका केली होती. यानंतर साविआकडून त्याच पध्दतीने लेवेंवर प्रतिटीका झाली. टीका-प्रतिटीकेमुळे साविआतील गटबाजी व ठरवून एखाद्याला एकटे पाडण्याचे धोरण समोर आले. चार दिवसांपूर्वी अभिनेते प्रशांत दामले यांनी शाहू कलामंदिरास भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेवक किशोर शिंदे व इतर उपस्थित होते. मात्र, उपाध्यक्ष मनोज शेंडे गैरहजर होते. याचा कानोसा घेतला असता, शेंडे बाहेर असल्याचे सांगण्यात आले. हे कारण सांगून अर्धा तास उलटायच्या आतच शेंडे शहराच्या विविध भागांत इनोव्हातून फिरत असल्याचे अनेकांना दिसले. 

FasTag कसं मिळवाल आणि कधीपर्यंत असते वॅलिडिटी? वाचा सविस्तर

यानंतर तीन दिवसांनी खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटर हस्तांतरण व इतर कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना नगराध्यक्षा माधवी कदम गैरहजर होत्या. तिन्ही ठिकाणच्या कार्यक्रमांना त्या गैरहजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचा कानोसा घेतला असता कदम या एका खासगी कार्यक्रमासाठी शनिवारी सहकुटुंब जिल्ह्याच्या एका भागात गेल्याचे व त्यांना एका महिला सभापतीने फोनव्दारे कार्यक्रमाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
 
उदयनराजेंच्या उपस्थितीतील कार्यक्रम दहा दिवसांपूर्वी ठरवण्यात आले होते. या कार्यक्रमांची पूर्वकल्पना नगराध्यक्ष कदम यांना देण्याचे संकेत संबंधितांनी पाळले नसल्याचे कदम यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. एकमेकांनी ठरविलेल्या कार्यक्रमांना गैरहजर राहण्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या प्रकारामुळे साविआतील अशांततेवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

रंजना रावत रजा काळाची पुनरावृत्ती?
 
निवडणुकीच्या तोंडीवर आगामी काळात ही गटबाजी आणखी उफाळण्याची चिन्हे नाकारता येणार नाहीत. या गटबाजीमुळे रंजना रावत रजा काळाची पुनरावृत्ती होण्यापूर्वीच खासदार उदयनराजेंनी संबधितांचे "व्हॅक्‍सीनेशन' करण्याची गरज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()