Udayanraje Bhosale : 'सातारा लोकसभा' जिंकूनही तीन महिन्‍यांत उदयनराजेंनी का दिला होता राजीनामा? कारण आलं समोर..

मी गेली अनेक वर्षे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (Satara Loksabha Election) लढवत आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

'निवडून आल्‍यानंतर तीन महिन्‍यांत राजीनामा देणे सोपी गोष्‍ट नाही. मला त्यापूर्वी अनेकजण सांगत होते, की आत्‍महत्‍या करताय. सरपंचही राजीनामा देत नाही; पण मी दिला.'

सातारा : मी गेली अनेक वर्षे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (Satara Loksabha Election) लढवत आहे. ज्‍या घराण्‍याचे नाव मी सांगतो, त्‍याच्‍या विचारांशी माझी बांधिलकी आहे. त्‍यांचा विचार जो आचरणात आणतो, त्‍याच्‍याशी मी सहमत असतो. निवडून आल्‍यावर मी तीन महिन्‍यांत खासदारकीचा राजीनामा दिला. जे विचार आपल्‍याला पटत नाहीत, त्‍यांच्‍याबरोबर राहणे चुकीचे होते, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मंगळवारी सातारा येथे व्यक्त केली.

दरम्‍यान, उदयनराजेंनी राजीनामा देणे म्‍हणजे राजकीय आत्‍महत्‍या आहे, असे अनेकजण सांगत होते. ती आत्‍महत्‍या असेल तर मी फक्‍त घराण्‍याच्‍या विचारांसाठीच केल्‍याची टिपणीही त्‍यांनी यावेळी केली. विकसित भारत संकल्‍प यात्रेची सुरुवात मंगळवारी त्‍यांच्‍या जलमंदिर पॅलेस येथे केंद्रीय गृहराज्‍यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्‍या उपस्‍थितीत झाली. यावेळी माजी आमदार मदन भोसले, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष धैर्यशील कदम, कऱ्हाडचे अतुल भोसले व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्‍थित होते.

MP Udayanraje Bhosale
Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगले, सातारा जागावाटप निश्‍चित; 'इंडिया' आघाडीचा निर्णय, कोण असणार उमेदवार?

पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे म्‍हणाले, ‘‘निवडून आल्‍यानंतर तीन महिन्‍यांत राजीनामा देणे सोपी गोष्‍ट नाही. मला त्यापूर्वी अनेकजण सांगत होते, की आत्‍महत्‍या करताय. सरपंचही राजीनामा देत नाही; पण मी दिला. शेवटच्‍या तीन महिन्‍यांत कोणीही राजीनामा देईल; पण मी निवडून आल्‍यानंतरच्‍या पहिल्‍या तीन महिन्‍यांत राजीनामा दिला. त्‍याचे कारण लक्षात घ्‍या. जो विचार आपल्‍याला पटत नाही, त्‍यांच्‍याबरोबर राहणे चुकीचे असल्‍याने मी राजीनामा दिला.

आत्‍महत्‍या तर आत्‍महत्‍या. केली. मनाला न पटणाऱ्या गोष्‍टीला मी उघड विरोध करतो. मी कुणालाही कमी लेखत नाही. लोकांच्‍या नजरेत पडणे वेगळे आणि स्‍वत:च्‍या नजरेत पडणे वेगळे. यामुळेच मी निवडून आल्‍यानंतर राजीनामा दिल्‍याचा पुनरुच्‍चारही त्‍यांनी यावेळी केला.

MP Udayanraje Bhosale
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'वंचित'कडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी पाटलांना दिलं 'हे' आश्वासन

उदयनराजे म्‍हणाले

  • मी ज्‍या घराण्‍याचे नाव सांगतो, त्‍याच्‍या विचारांशी बांधिलकी

  • मुद्द्यावरील राजकारण केले नाही, केले ते फक्‍त समाजकारण

  • लोकांचे हित जोपासले गेले पाहिजे, त्‍यादृष्‍टीनेच माझे प्रयत्‍न

  • मनाला न पटणाऱ्या गोष्‍टीला मी उघड विरोध करतो

  • मी कुणालाही कमी लेखत नाही; पण न पटणाऱ्या विचारांबरोबर राहणे चुकीचे

  • लोकांच्‍या नजरेत पडणे वेगळे आणि स्‍वत:च्‍या नजरेत पडणे वेगळे

MP Udayanraje Bhosale
गडहिंग्लजमध्ये जनता दलाला मोठा हादरा; 'हे' बडे नेते अजितदादा, मुश्रीफांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

‘ते’ माझ्‍यासाठी इच्‍छा व्‍यक्‍त करताहेत

सातारा लोकसभा मतदारसंघाच्‍या आगामी निवडणुकीसाठी अनेकांनी इच्‍छा व्‍यक्‍त केली आहे. तसे दावे त्‍यांच्‍याकडून करण्‍यात येत आहेत. मात्र, तुम्‍ही अजूनही नाव पुढे केले नाही, या प्रश्‍‍नावर उदयनराजे यांनी, अहो जे जे इच्‍छा व्‍यक्‍त करत आहेत ना, ते माझ्‍यासाठीच, असे उत्तर देताच उपस्‍थितांमध्‍ये एकच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.