रस्त्यावर धारदार शस्त्रे नाचवली गेली आहेत. गोळीबार देखील झाला आहे. अशा अनपेक्षित प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते.
सातारा` : गुटखा विक्री करणाऱ्यांबरोबरच दहशत माजवणाऱ्यांना पोलिस यंत्रणा पत्र्या कधी ठोकणार? याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा आहेत. ती कारवाई पोलिस यंत्रणा (Police) करणार का, कोयता, तलवारी नाचवणाऱ्यांचा बंदोबस्त करणार का? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाद्वारे पोलिस यंत्रणेस विचारला आहे.
खासदार उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे, की व्यसने आणि व्यसनांधांचे आम्हीच काय कोणीही समर्थन करणार नाही. गुटखा वाईट आहे, तर त्याच्या उत्पादनावरही शासनाने बंदी घातली पाहिजे. शासन नियमातील तफावतीमुळे सर्वसामान्य अडचणीत येत आहेत. पोलिसांचा वचक दहशत माजवणाऱ्यांवर असली पाहिजे; परंतु ती गोरगरिबांवर असल्याचे विविध कारवायांमधून स्पष्ट होत आहे.
दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री दहशत पसरवणाऱ्यांचा आणि त्यांच्या सूत्रधारांचा बंदोबस्त प्रथम केला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, समाजातील कोणालाही कधीही रस्त्याने जाता येता आले पाहिजे, अशा प्रकारची सुरक्षा पुरवली पाहिजे आणि मग छोट्या व्यावसायिकांवर कायद्याने कारवाई करावी, असे मतही त्यांनी पत्रकात मांडले आहे.
अडवून, वाटमारी-जबरी चोरी झाली आहे. रस्त्यावर धारदार शस्त्रे नाचवली गेली आहेत. गोळीबार देखील झाला आहे. अशा अनपेक्षित प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. दहशतखोरांचा बंदोबस्त झाल्यावर, गुटखा किंवा तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याच्या उपक्रमाला अधिक चांगला अर्थ मिळेल, असा विश्वासही उदयनराजेंनी पत्रकात व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.