खंडाळा (जि. सातारा) : खंडाळा तालुका कोरोनाचा (Coronavirus) हॉटस्पॉट ठरत असल्याने येथील कंपन्या बंद ठेवाव्यात व कंपनीमार्फत सुसज्ज हॉस्पिटल (Hospital) उभारावे, या मागणीसाठी येथे आंदोलन सुरू होते. यासंदर्भात शनिवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार मकरंद पाटील (Makrand Patil), जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व कंपनी प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत खंडाळा येथे सुसज्ज कोरोना हॉस्पिटल उभे करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला.
या वेळी सुनील काटकर, प्रा. एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, प्रदीप माने, एमआयडीसीचे इंगळे, सहायक कामगार आयुक्त रोकडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांच्यासह कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
कंपनी प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप करत खंडाळा येथे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, प्रा. एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, प्रदीप माने, चंद्रकांत ढमाळ आदींनी आंदोलनाची व आत्मदहनाची भूमिका घेतली होती. याची दखल घेत आज सातारा येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी कंपन्याचे टर्नओव्हर किती? सीएसआर फंड कोणाला दिले? याची यादी कामगार आयुक्त, अधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी. कंपन्यांनी यापूर्वी कोरोना हॉस्पिटल उभे करायला हवे होते. निदान आता तरी तातडीने खंडाळ्यात मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल उभारावे, अन्यथा कंपन्या सुरू करू देणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. या वेळी आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे कोरोना केअर सेंटर नको, तर कोरोना हॉस्पिटल कंपनी माध्यमातून उभे राहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. नितीन भरगुडे-पाटील यांनी हे आंदोलन तालुक्यातील जनतेच्या हितासाठी होते. आमची मागणी मान्य झाल्याने हे आंदोलन मागे घेत आहोत, असे सांगितले. या वेळी प्रा. एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, प्रदीप माने यांनीही आपले मत व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी खंडाळा तहसीलदारांना तातडीने जागा पाहण्याचे व कंपन्यांकडून हे हॉस्पिटल उभे करण्याचे आदेश बैठकीत दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.