सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे एकमत झाले आहे. राज्यपालांच्या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिले आहे. मोदी याबाबत गांभीर्याने विचार करतील आणि कारवाई करणार, याची मला खात्री आहे. कृपया या विषयाकडे राजकारणाच्या नजरेतून पाहू नका, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहे. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या शिवरायांबाबतच्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक आहेत. रायगडावर जावून नुकतेच आत्मक्लेष आंदोलन केले होते. राज्यपालांवर कारवाई करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शुक्रवारी) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे २५ मिनिटांच्या या बैठकीत उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आपली बाजू मांडली.
या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श आहेत. यांच्याबाबत अवमानकारक विधान करणारे राज्यपाल कोशारी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत सर्व खासदारांचे एकमत झाले आहे. राज्यपालांच्या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिले आहे. मोदी याबाबत गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे. कृपया या विषयाकडे राजकारणाच्या नजरेतून पाहू नका, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली. मध्यप्रदेशचे खासदारही महाराष्ट्रातील खासदारांच्या मताशी सहमत असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. पंतप्रधान मोदी राज्यपालांविषयी कारवाई करणार, याची मला खात्री आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माफी न मागितल्याची खंत
कोश्यारींच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगून उदयनराजे म्हणाले, राज्यपालांनी केलेल्या विधानाला भाजप जबाबदार नाही. मात्र, इतके काही घडूनही राज्यपाल माफी मागत नाहीत, याची खंत आहे, असेही ते म्हणाले. कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे पिंपरी- चिंचवड येथे एकदिवसीय बंद पाळण्यात आला. या बंदला उदयनराजे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.