लॉकडाउन रद्द करा, अन्यथा आंदोलन करणार; दलित महासंघाचा इशारा

Lockdown
Lockdownesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या (Coronavirus) नावाखाली नागरिकांची लूट सुरु आहे. गेल्या महिन्यापासून लॉकडाउन (Lockdown) करुन देखील बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यातच कोरोना अहवाल अपडेट घोटाळा समोर आला असून प्रशासनाने यातील सत्य स्पष्ट करावे. तसेच जनतेवर लादलेला लॉकडाउन रद्द करुन गोरगरिबांचे जगणे सुसह्य करावे, अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन करू, असा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण (Umesh Chavan) यांनी दिला आहे. (Umesh Chavan Demand To District Collector Shekhar Singh To Cancel The Lockdown)

Summary

जिल्ह्यात कोरोनाच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरु आहे. गेल्या महिन्यापासून लॉकडाउन करुन देखील बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.

यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांना दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीपासून कोरोना स्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. नागरिक नियम पाळत आहेत. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांचे जगणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक, भाजीपाला विक्री करणारे, रिक्षाचालक, बांधकाम व्यवसायातील कामगारांवर काम नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Lockdown
अख्या कर्नाटकात पोलिसांचा सापळा : 36 हजार फोन नंबर, 700 संशयित

जिल्हाधिकारी व मंत्री एसीत बसून निर्णय घेत आहेत. मात्र, त्याची झळ जनता भोगत आहे. त्यातच सुरु असलेल्या कोरोना महामारीत अनेकांचे हॉस्पिटलच्या खर्चाने दिवाळे निघाले आहे. सध्या कोरोना बाधितांचे आकडे कमी होत नसल्याने सगळे हैराण असतानाच अहवाल अपडेट न करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला जबाबदार असलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली करावी. खोटे रिपोर्ट देणारे, रुग्णांना लुटणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी दलित महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष ओंकार निकम उपस्थित होते.

Umesh Chavan Demand To District Collector Shekhar Singh To Cancel The Lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.