कास पठार हे जगप्रसिद्ध फुलांसाठी नैसर्गिक व शाश्वत पर्यटनाचे ठिकाण नामांकित झाल्यामुळे पर्यटकांचा ओढा हा कायम राहणार आहे.
कास : ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मधुकर बाचूळकर (Environmental Expert Madhukar Bachulkar) यांनी नुकतेच कासचा जागतिक वारसा स्थळ म्हणून असलेला दर्जा काढून घेण्यासंदर्भात युनेस्कोला (UNESCO) पत्र पाठविणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर कास पठाराचे व्यवस्थापन पाहणारी कास कार्यकारी समिती बाचूळकर यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. समितीच्या माध्यमातून कासचा शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.