माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांचे समर्थन मिळालेल्या 'पॅनेल'चा 21-0 ने 'धुरळा'

Krishna Sugar Factory
Krishna Sugar Factoryesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Krishna Co-operative Sugar Factory Election) सत्तारूढ डॉ. सुरेश जयवंतराव भोसले (Dr. Suresh Bhosale) यांच्या सहकार पॅनेलने (Co-operation panel) मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवून कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली. सहकार पॅनेलने प्रत्येक गटात सुमारे दहा हजारांवर मताधिक्याने २१-० अशी आघाडी घेऊन कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मिळविला. (Unilateral Victory Of Dr. Suresh Bhosale Co-operation Panel In Krishna Sugar Factory Election Satara Political News)

Summary

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गट, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे समर्थन मिळालेल्या विरोधी संस्थापक व रयत पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गट MLA Prithviraj Chavan Group, राज्यमंत्री विश्‍वजित कदम Minister Vishwajit Kadam, काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर Congress leader Udaysingh Patil Undalkar यांचे समर्थन मिळालेल्या विरोधी संस्थापक व रयत पॅनेलला Rayat panel दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी स्थापन केलेल्या या कारखान्यात त्यांचे पुत्र इंद्रजित मोहिते यांचे पॅनेल तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहे. निकाल जाहीर होताच सहकार पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक दर वेळी गाजते. या वेळच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार, अविनाश मोहिते यांचे संस्थापक आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलमध्ये चुरशीने निवडणूक झाली. कारखान्यासाठी ४७ हजार १४५ पैकी ३४ हजार ५३२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. उत्स्फूर्त मतदान झाल्याने सभासदांनी नेमका कोणाला कौल दिला याची उत्सुकता होती.

Krishna Sugar Factory
कृष्णा कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल पाहा एका क्लिकवर..

येथील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी ७४ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करून त्यासाठी ३२५ कर्मचारी नेमले होते. पहिल्यांदा अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती या गटाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर महिला राखीव व त्यानंतर एक ते सहा गटांची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच डॉ. भोसले यांच्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. दरम्यान, पहिल्या फेरीअखेर सहकार पॅनेलच्या उमेदवारांना सुमारे साडेपाच हजारांचे मताधिक्य मिळाले, तर दुसऱ्या अंतिम फेरीत ते मताधिक्य दहा हजारांवर गेले. भोसलेंना मिळालेले मताधिक्य कृष्णा कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. निकाल जाहीर होताच सहकार पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोष करत कृष्णा चॅरिटेबलचा परिसर दणाणून सोडला. दरम्यान, गावोगावीही फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

Krishna Sugar Factory
'कृष्णा'च्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने हस्तक्षेपाचा डाव लावला उधळून

क्रॉस व्होटिंगला फुली

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या मागील निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होऊन विरोधी संस्थापक पॅनेलचे सहा उमेदवार निवडून आले होते. यावेळच्या निवडणुकीतही क्रॉस व्होटिंग होईल, अशी विरोधी गटाच्या समर्थकांना शक्यता वाटत होती. मात्र, मतदारांनी भोसलेंच्या सहकार पॅनेलला एकतर्फी सत्ता दिल्याने क्रॉस व्होटिंगवर यंदाच्या निवडणुकीत मतदारांनीच फुली मारल्याचे दिसून आले.

...अखेर झाला भ्रमनिरास

मतमोजणी दरम्यान रेठरे बुद्रुक गटामध्ये क्रॉस व्होटिंग होऊन काहीतरी बदल होईल, अशी आशा विरोधी पॅनेलच्या समर्थकांना होती. मात्र, तेथेही पहिल्याच फेरीत डॉ. सुरेश भोसले यांनी पाच हजारांच्यापुढे मताधिक्य घेऊन आघाडी घेतली. त्यामुळे विरोधकांचा भ्रमनिरास झाला.

सभासदांनी विश्‍वास दाखवून कारखान्याची एकहाती सत्ता आमच्या हातात दिली. सहा वर्षांत चांगले काम झाले. विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने त्यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. याला मतदारांनी निकालातून उत्तर दिले. यापुढे गटतट बाजूला ठेऊन सर्वांना न्याय्य वागणूक मिळेल, कोणावरही अन्याय होणार नाही.

-डॉ. सुरेश भोसले

Krishna Sugar Factory
ED कडून मोठी कारवाई! अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

सभासदांनी डॉ. सुरेश भोसले यांना प्रामाणिकपणे काम करणारा एक सच्चा माणूस म्हणून उचलून धरले. ‘कृष्णा’च्या संघर्षाच्या राजकारणातील आमचा सर्वात मोठा विजय झाला आहे. अनेक राजकीय लोकांनी कृष्णा कारखान्यात हस्तक्षेप करून राजकीय अड्डा बनवण्याचे षडयंत्र रचले. मात्र, सुज्ञ सभासदांनी हा डाव उधळून लावला.

-अतुल भोसले

सभासदांनी यशवंतराव मोहिते रयत पॅनेलला दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. कष्टकरी, श्रमिक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांचे सहकारी संस्थेतील हक्क अबाधित राखण्यासाठी आम्ही यापुढे कटिबद्ध राहू. सभासदांचे मनःपूर्वक आभार मानतो.

-डॉ. इंद्रजित मोहिते

Unilateral Victory Of Dr. Suresh Bhosale Co-operation Panel In Krishna Sugar Factory Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.