मागील निवडणुकीत सोसायटी मतदारसंघासह इतर मतदारसंघातून सहा जण बिनविरोध झाले होते.
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खरेदी विक्री संघ मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) व महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे (Rajendra Rajpure) तसेच कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर (Shivarupraje Khardekar) यांच्या विरोधात अर्ज दाखल न झाल्याने ते जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधून तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीची (NCP) सरशी पहायला मिळतेय.
बँकेच्या मागील निवडणुकीत सोसायटी मतदारसंघासह इतर मतदारसंघातून सहा जण बिनविरोध झाले होते. यावेळेस मात्र, बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वसमावेश पॅनेल, तसेच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरे पॅनेल झाले आहे. त्यांनी दोन चार जागा वगळता उर्वरित सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज त्यांच्या पॅनेलच्यावतीने भरले आहेत. तसेच माणचे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही आपले तिसरे पॅनेल तयार केले आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत असल्याचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र दिसत आहे. पण अर्ज मागे घेतल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खरेदी विक्री मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातून ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुसरे कृषी प्रक्रिया मतदारसंघातून कै. दादाराजे खर्डेकर यांचे चिरंजीव शिवरूपराजे खर्डेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे यांच्याविरोधातही अर्ज नसल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.