Video पाहा : Remdesivir चा साठा वाढविण्यासाठी नियोजन सुरू; इंजेक्शनच्या वापराबाबत वैद्यकीय अधिका-यांनी ठरवावे

Video पाहा : Remdesivir चा साठा वाढविण्यासाठी नियोजन सुरू; इंजेक्शनच्या वापराबाबत वैद्यकीय अधिका-यांनी ठरवावे
Updated on

सातारा : रुग्णांना सरसकट रेमडेसिव्हिरचे इंजेक्‍शन न देता रुग्णांची स्थिती पाहूनच रेमडेसिव्हिर द्या. याचबरोबर रेमडेसिव्हिरचा साठा जिल्हास्तरावर वाढविण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. कोविड अथवा खासगी रुग्णालयात चाचणी बाधित आली, की रेमडेसिव्हिर मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावाधाव सुरू होते. अनेक ठिकाणी केवळ एचआरसीटीचा स्कोर पाहून मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिरची मागणी होते. मात्र, रुग्णांचे वय, इतर आजार, प्रतिकारशक्ती या सर्व बाबींची तपासणी करून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने रेमडेसिव्हिर घ्यावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर श्री. सिंह यांनी जिल्ह्यातील कोरोना लशीचा साठा, बाधित रुग्णांची स्थिती, उपाययोजना, रेमडेसिव्हिरची उपलब्धतेची, लसीकरण आदींची माहिती देत कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर 

 श्री. सिंह म्हणाले, ""मागील काही दिवसांत बाधित रुग्णांच्या संख्येत व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजार 117 रुग्ण आढळले होते. सद्यःस्थितीत त्याच्या जवळपास रुग्णसंख्या आढळण्यास सुरुवात झाली असून, नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. कोविडला आळा घालण्यासाठी प्राथमिकस्तरावर लक्षणे दिसणाऱ्या संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, सद्यःस्थितीत बहुतांश ठिकाणी कोरोनाची लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील रेमडेसिव्हिरची उपलब्धता जम्बो कोविड रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांत केली जाणार आहे. कोविड विरोधात लढा देण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

सातारकरांनाे! लस घेण्यासाठी सिव्हीलला निघालात? थांबा, हे वाचा

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लक्षणे सारखीच असल्याचे आढळून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक असल्याने सद्यःस्थितीत कोरोनाला आटोक्‍यात आणण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ चाचणी करावी. अनेक जण कोरोनाची लक्षणे दिसत असूनही टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे, तसेच वयोवृद्ध नागरिक, मधुमेह व इतर आजार असणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे. 

Home Isolation मधील फिरणा-यांवर गुन्हे दाखल करा

रेमडेसिव्हिर देण्याचे डॉक्‍टरांनी ठरवा 

कोविड अथवा खासगी रुग्णालयात चाचणी बाधित आली, की रेमडेसिव्हिर मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावाधाव सुरू होते. अनेक ठिकाणी केवळ एचआरसीटीचा स्कोर पाहून मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिरची मागणी होते. मात्र, रुग्णांचे वय, इतर आजार, प्रतिकारशक्ती या सर्व बाबींची तपासणी करून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने रेमडेसिव्हिर घ्यावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले आहे.

जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; Whatsappच्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.