साताऱ्यात आज 15 प्रभागांत लसीकरण; जिल्हा परिषदेचा पुढाकार

लसीकरण
लसीकरण esakal
Updated on
Summary

शहरातील महालसीकरण अभियानात लसीकरणाची टक्केवारी निश्‍चितपणे वाढणार आहे.

सातारा: जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण मोहिम वेग घेत असताना शहरी भागात नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन शहरात आज (मंगळवार) एकाच दिवशी १५ प्रभागांत लसीकरण मोहिम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहरातील महालसीकरण अभियानात लसीकरणाची टक्केवारी निश्‍चितपणे वाढणार आहे.

लसीकरण
सातारा: मिनी काश्मीर कास पठारावर पर्यटकांचा बहर

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. मात्र, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे टक्केवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने साताऱ्यात एकाच दिवसात प्रभागनिहाय लसीकरण मोहिम आखण्याचे नियोजन केले आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचीही मदत घेतली आहे. याचबरोबर आवश्यक कर्मचारी, प्रभागनिहाय लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवकांची नेमणूक आदींचे नियोजन केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील १७ लाखांहून अधिक नागरिकांना पहिला व सात लाखांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आता शहरातील प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेमुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

लसीकरण
सातारा : जिल्‍ह्यात आज 3 हजार 65 बाप्‍पांचे विसर्जन

राज्यभरात लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात आज कोव्हिशिल्ड ३८ हजार, तर कोव्हॅक्सिनचे आठ हजार ९०० डोस उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली असून, नागरिकांनीही लसीकरणासाठी प्रतिसाद देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

लसीकरण
सातारा : झाडांच्या फांद्या तोडल्याबद्दल वीज कंपनीला नोटीस

‘‘शहरातील लसीकरण वाढण्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण मोहिम होणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून मोहिम यशस्वी राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनीही लसीकरणासाठी प्रतिसाद द्यावा.’’

- प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

लसीकरण
पुणे-सातारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

केंद्रावरही नोंदणी होणार

सातारा शहरात ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुरु आहे. मात्र, आज शहरात प्रभागनिहाय लसीकरण करताना ऑनलाइन लसीकरणाबरोबर केंद्रावरही नोंदणी करून लस घेता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही, अशा नागरिकांनाही आज लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.