'महाराजांचा अपमान कराल, तर खपवून घेणार नाही'

Vasantrao Mankumare
Vasantrao Mankumareesakal
Updated on
Summary

'महाराजांचा असा अवमान खपवून घेतला जाणार नाही.'

कुडाळ (सातारा) : हभप दत्तात्रय महाराज कळंबे (Dattatraya Maharaj Kalambe) यांच्या निर्वाणदिनानिमित्त झालेल्या पुण्यतिथी सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी करून व महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरेप्रमाणे सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देऊन गालबोट लावणाऱ्या वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांचा वारकरी सांप्रदाय व नियोजन समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. महाराजांच्या घरावर दगड मारणारांनी समाधिस्थळाचा आखाडा बनवू नये, असा इशारा जावली बँकेचे (Jawali Bank) माजी संचालक व महाराजांचे नातू विनोद कळंबे यांनी दिला.

येथे पत्रकार परिषदेत श्री. कळंबे यांनी घडलेल्या प्रकारावर टीका केली. जावली बॅंकेची आगामी निवडणकू डोळ्यापुढे ठेवूनच मानकुमरे यांनी स्वत:चा मोठेपणा मिरवण्यासाठी कार्यक्रमाचा औचित्य भंग करून वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोचवली आहे, अशी टीका करून विनोद कळंबे म्हणाले, ‘‘महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांना हरताळ फासून या कार्यक्रमाचा राजकीय आखाडा कोणीही बनवू नये.’’ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी सांप्रदायाच्या नियमानुसार धार्मिक कार्यक्रम होतात. यावर्षीच्या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देऊन काही मंडळींनी गालबोट लावले. काल्याचे कीर्तन सुरू असताना वसंतराव मानकुमरेंनी राजकीय कारणाने नेत्यांची मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे कीर्तन थांबवावे लागले. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे.

Vasantrao Mankumare
'तुम्हाला बघितल्यानंतर पारणंच फिटतं', भर मंचावर उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

हा महाराजांच्या निर्वाणाचा कार्यक्रम होता. अशा दुःखदप्रसंगी अशा प्रकारे उत्सव करणे दुर्भाग्यपूर्ण आहे, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात केवळ राजकीय सत्कार करण्यात आले. स्वतःची कविता सादर करण्यासाठी आरती थांबवण्याचा प्रयत्न झाला. यापुढे महाराजांचा असा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा नियोजन समितीच्या व वारकरी सांप्रदायाचे वतीने देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व नियोजक शंकर बेलोशे, विनोद विठ्ठल कळंबे, भीमराव रांजणे, संतोष बेलोशे, रुईघरचे माजी सरपंच अंकुश बेलोशे, वसंत रांजणे, एकनाथ जाधव, जगन्नाथ आमराळे, बापूराव गोळे, विणेकरी गणपत बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

Varkari Sampraday committee
Varkari Sampraday committee
Vasantrao Mankumare
हिम्मत असेल तर समोरासमोर या; आमदार शिवेंद्रराजेंचं उदयनराजेंना थेट चॅलेंज

कळंबे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्वांनी यावे. पण, या सांप्रदायिक कार्यक्रमाचे भान ठेऊन त्याचा आदर ठेवावा.

- विनोद कळंबे, महाराजांचे नातू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()