Vasota Fort : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वासोटा किल्ला 'इतके' दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

सुटीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची (Tourists) मांदियाळी दिसून येते.
Vasota Fort Bamnoli
Vasota Fort Bamnoliesakal
Updated on
Summary

जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे.

कास : निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील (Vasota Fort) पर्यटनास ३० डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती बामणोली (Bamnoli) वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली.

जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुटीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची (Tourists) मांदियाळी दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात.

Vasota Fort Bamnoli
Loksabha Election : लोकसभा तोंडावर असतानाच उदयनराजे भाजपवर नाराज? बावनकुळे म्हणाले, त्यांच्या मनात कुठलीही..

त्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभाक्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्गसंपत्तीला कोणतीही हानी पोचू नये, यासाठी पर्यटकांना ३० डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग क्लबना देण्यात आल्या आहेत.

Vasota Fort Bamnoli
Konkan Tourism : 'थर्टी फर्स्ट'साठी कोकणातील गुहागरला पर्यटकांची सर्वाधिक पसंती; चौपाटीसह पर्यटनस्थळी मोठी गर्दी

वासोटा किल्ला परिसरात ३० डिसेंबरपासून तीन दिवस कोणीही बेकायदेशीररीत्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-विजय बाठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.