विसापूर (सातारा) : संत संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात वासुदेवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गावागावांत पहाटे घरोघरी जाऊन अभंग, गवळणी गात दान मागणारा हा लोककलाकार. याच वासुदेवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळात हेरगिरीचे काम केले. आता तोच वासुदेव कोरोना संकटकाळात सामाजिक भान जपत कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करताना दिसत आहे. बुध येथील पथनाट्य कलाकार सचिन महाजन (Artist Sachin Mahajan) व त्यांचा ग्रुप वासुदेवाचा वेश धारण करून उत्तर खटावमध्ये कोरोना संसर्गाविषयक (Coronavirus) जनजागृती करण्याचे काम करत आहे. (Vasudev Is Raising Awareness About Coronavirus At Khatav Satara Marathi News)
गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे अशी वेशभूषा आणि मुखी मंजुळ वाणी यामुळे हा वासुदेव सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात धोतर, कमरेभोवती शेला वजा गुंडाळलेले उपरणे, एका हातात चिपळ्या तर दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी. गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे अशी वेशभूषा आणि मुखी मंजुळ वाणी यामुळे हा वासुदेव सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सध्या श्री. महाजन व त्यांचा पथनाट्य ग्रुप रोज उत्तर खटावमधील वेगवेगळ्या गावांत गल्लोगल्ली फिरून कोरोनाविषयी जनजागृती (Awareness About Coronavirus) करत आहेत. कोणत्याही गल्लीत गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, गरज असेल तरच घराबाहेर पडा, एकाच ठिकाणी जास्त माणसे दिसली तर घोळक्याने उभे राहू नका, वेळोवेळी हात धुवा, मास्क, सॅनिटायझर वापरा, ताप, सर्दी, खोकला झाला तर डॉक्टरला दाखवा. लसीकरण करून घ्या, असा ते संदेश देत आहेत. दरम्यान, वासुदेव ही घराघरांत पोचलेली लोककला असल्याने जनजागृती करणे सोपे जात असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.
Vasudev Is Raising Awareness About Coronavirus At Khatav Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.