..तर ऑनलाइन शिक्षणावर बहिष्कार घालू; शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षांचा इशारा

Online Teaching
Online Teachingesakal
Updated on

मलकापूर (सातारा) : विना दाखला शालेय प्रवेशाबाबतचा (School admission) शासनाचा निर्णय चुकीचा आहे. वेतनेत्तर अनुदान आणि शैक्षणिक फी Education Fee घेण्यास शासनाने आडकाठी केली, तर ऑनलाइन शिक्षणावर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे (Maharashtra State Institute of Education Corporation) उपाध्यक्ष अशोकराव थोरात (Vice President Ashokrao Thorat) यांनी दिला. (Vice President Ashokrao Thorat Warns The Government To Boycott Online Education Satara Education News)

Summary

सातारा येथे कोल्हापूर विभाग व सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाची 25 जूनला बैठक होत आहे.

शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक आज श्री. थोरात यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. श्री. थोरात म्हणाले, सातारा येथे कोल्हापूर विभाग व सातारा जिल्हा शिक्षण संस्था (Satara District Institute of Education) संघाची 25 जूनला बैठक होत आहे. बैठकीत या दोन्ही विषयावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. शिष्ठमंडळाच्या वतीने शिक्षण मंत्री व अर्थमंत्र्यांची चर्चा करण्यात येईल. वेतनेत्तर अनुदान मिळाले नाही व योग्य ती शैक्षणिक फी घेण्यास शासनाने आडकाठी केली, तर ऑनलाइन शिक्षणावर (Online Teaching) संस्था व शाळामार्फत बहिष्कार घालण्यात येईल.

Online Teaching
..तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना व घटकांनी महाराष्ट्र शासनाच्या अशा शैक्षणिक निर्णयाला विरोध करुन धोरणे हाणून पाडली पाहिजेत. शासनाने वरील दोन्ही निर्णयाचा फेरविचार करावा. रविंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षक हक्क कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून शासनाने विना दाखला प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. सदर निर्णय सर्व प्रकारच्या शाळा विद्यालयांना लागू केला, तर शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडेल. याबाबत आमदार जयंत आसगावकर यांनी वेतनेत्तर अनुदान व विना दाखला शाळा प्रवेशाबाबत शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अॅड. गुरव रावसाहेब पाटील, सचिन सूर्यवंशी, अबिदा इनामदार यांच्यासह बैठकीमध्ये राज्यातील तज्ञ व शिक्षण संस्था चालकांनी सहभाग घेतला.

Vice President Ashokrao Thorat Warns The Government To Boycott Online Education Satara Education News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.