आवर्जून पुस्तक वाचा, आम्हाला कळवा!

वाचन प्रेरणा दिनानिमित्त (१५ ऑक्टोबर) पुस्तकांचं गाव प्रकल्पाचे आवाहन
वाचन प्रेरणा दिन
वाचन प्रेरणा दिनsakal News
Updated on

भिलार : कोरोनाच्या संकटाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पाच्या माध्यामातून यंदाही वाचन प्रेरणा दिनानिमित्त (१५ ऑक्टोबर) पुस्तकांची आणि वाचनाची आवड वाढवणारे उपक्रम योजण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. दि. ८ ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आवर्जून ठरवून, निश्चयाने किमान १ (किंवा अधिक) पुस्तक वाचावे, असे आवाहन प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

वाचन प्रेरणा दिन
अफगाणिस्तानात मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, ५० जणांचा मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत हे ‘पुस्तक वाचनाचे आवाहन’ समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडियाद्वारे) पोहोचवण्यात येत आहे. तसेच वाचकांनी आपल्या वाचनाचा तपशील (आपले नाव, गाव, जिल्हा, वाचनाचा वेळ, पुस्तक-लेखक- प्रकाशनाचे नाव, वाचलेल्या पानांची संख्या, वाचन करतानाचे छायाचित्र इ...) pustakanchgaav.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावा किंवा 9767631396 / 9545126007 यांपैकी एका व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा, असेही कार्यालयाने कळवले आहे.

गेल्या ५ वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दूल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील उत्साही आणि जाणकार वाचकांमुळे वाचन प्रेरणा दिन ही आता एक लोकचळवळ झाली आहे. पुस्तकांचं गाव, भिलार येथेही गेली ४ वर्षे वाचनध्याससारखे सलग वाचनाचे उपक्रम योजण्यात आले होते. तसेच कोरोना-संकटकाळात गेल्या वर्षीही ‘आभासी व्याख्यानासह’, ‘पुस्तक वाचा आणि कळवा’ हा उपक्रम योजण्यात आला होता.

वाचन प्रेरणा दिन
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 5 जिल्ह्यांत सर्वाधिक

व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानही...

पुस्तक वाचनाच्या आवाहनाबरोबरच प्रकल्प कार्यालयाच्या वतीने व्हर्च्युअल (आभासी) अभिवाचन आणि व्याख्यानही योजण्यात आले आहे. गुरुवार, दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक पुस्तकप्रेमी वाचक (सुमारे १५) त्यांच्या आवडत्या पुस्तकाचे प्रत्येकी ३ मि. अभिवाचन करणार असून, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे अभिवाचकांना आणि इतर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. १४ ऑक्टोबर रोजी स. १०.३० ते १२.३० या वेळात अभिवाचन व व्याख्यान होणार असून, पुस्तकांचं गाव प्रकल्पाच्या फेसबुक पेजवर व्हर्च्युअल कार्यक्रमाची लिंक (दुवा) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पुस्तकांच्या गावातील (भिलारमधील) विविध उपक्रमांत वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग नेहमी असतोच. गेल्या वर्षी ‘आवर्जून पुस्तक वाचा, आम्हाला कळवा’ या आवाहनास खुद्द भिलारसह संपूर्ण राज्यातून सुमारे ५०० वाचकांनी प्रतिसाद दिला होता. वाचनप्रेरणा जागृत ठेवणाऱ्या या उपक्रमासह व्हर्च्युअल व्याख्यानातही जास्तीतजास्त पुस्तकप्रेमींनी आपला सहभाग नोंदवावा, असे आग्रही आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांनी केले. तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून वाचन प्रेमीनी भिलार गावास वाचनानंद घेण्यासाठी आवर्जून भेट द्यावी असेही आवाहन पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.