Sharad Pawar : अजितदादा गटातील 'या' बड्या नेत्याविरोधात शरद पवार देणार तगडा उमेदवार; पुण्यात ठरली रणनीती

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वाई मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar vs Makarand Patil
Sharad Pawar vs Makarand Patilesakal
Updated on
Summary

लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला; पण त्यांना वाईमधून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जादा मते मिळाली आहेत.

सातारा : विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाने जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) वाई विधानसभा मतदारसंघातून (Wai Assembly Constituency) मताधिक्य मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत वाईतील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून विधानसभेसाठी इच्छुकांत एकमत करण्याची सूचना पवार यांनी केली. लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला; पण त्यांना वाईमधून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जादा मते मिळाली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वाई मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar vs Makarand Patil
Vishalgad Riots : विशाळगड दंगलीचा 'मास्टर माईंड' शोधा, गजापुरात जाळपोळ-हल्ले करणारे शिवभक्त कसे? जयंत पाटलांचा सवाल

या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांच्यासोबत आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात वाई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची सकाळी साडेदहा वाजता बैठक झाली. यामध्ये खासदार शरद पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली, तसेच तुमच्यापैकी इच्छुकांनी एकाच्या नावावर एकमत करण्याची सूचना त्यांनी केली आहे, तसेच ऑगस्टमध्ये वाई मतदारसंघासाठी पवार तीन दिवस वेळ देणार आहेत.

यामध्ये पहिल्या दिवशी ते वाईतील बावधन, भुईंज, किकली, वाई शहर येथे लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर दुसऱ्यादिवशी शिरवळ, खंडाळा, लोणंद, तसेच तिसऱ्या दिवशी पाचगणी, महाबळेश्वर येथे बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन विद्यमान आमदाराच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे श्री. पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

Sharad Pawar vs Makarand Patil
'तुमच्यासारख्या निष्पापांना त्रास देण्याचा प्रकार चुकीचा, मी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही'; विशाळगड दंगलीवर अजितदादांचं स्पष्ट मत

उमेदवारीबाबत एकमत घडवणार

वाई मतदारसंघातून डॉ. नितीन सावंत, अनिल जगताप, रमेश धायगुडे, बंडा ढमाळ, शशिकांत पिसाळ यांची पत्नी अरुणादेवी पिसाळ आदींची नावे इच्छुकांत आहेत. महिला उमेदवार म्हणून अरुणादेवी यांचेही नाव पुढे येऊ शकते. या बैठकीत वाईतील आम्ही सर्व जण एकत्रित बसून एकमत घडवून आणू, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी पवार यांना दिला, तसेच सर्वांची एकजूट घडवून आमदार निवडून आणण्यास आग्रही भूमिका घेणार असल्याचा शब्द सर्वांनी शरद पवार यांना दिल्याचे दिलीप बाबर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.