वाई : येथील पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने घरफोडी व चोरीचे(burglary case) तीन गुन्हे उघडकीस आणले. याप्रकरणी अल्पवयीन (Minor boy)मुलासह चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सतीश संजय जाधव (वय १९), गणेश शंकर जाधव (वय २२) (दोघेही रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई) व सुनील विलास पवार (वय २६, रा. वेळे, ता. वाई) अशीअटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारीला सकाळी साडेअकरा ते तीन जानेवारी रोजी सकाळी साडेदरा वाजण्याच्या दरम्यान त. ल. जोशी विद्यालयातील संगणक विभागाच्या खोलीतून २६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार उपमुख्याध्यापक दादा बनसोडे यांनी दिली होती. या चोरीसंदर्भात पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना खास बातमीदाराकडून सिध्दनाथवाडीतील गुरेबाजार झोपडपट्टीत राहणाऱ्या तीन मुलांनी व एका अल्पवयीन मुलाने शहरात अनेक चोऱ्या केल्या आहेत, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार शहरात फिरताना तीन संशयित तरुण व एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी विद्यालयातील चोरीसह गंगापुरी व मच्छी मार्केट येथे सुरू असलेल्या नवीन बांधकामावरील २० सेन्ट्रींग प्लेटा, कृष्णा पुलाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणची केबल चोरली असल्याचे कबूल केले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जान्हवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. भरणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलिस नाईक सोनाली माने, हवालदार अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड आदींनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.