सातारा : वाई तालुक्यातील (Heavy Rain In Wai Taluka) कोंढावळे गावात दरड कोसळून (Wai Landslide) मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे अडकल्याचे समजताच रात्री नऊ वाजता राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी भर पावसातच कोंढावळे गावाकडे धाव घेतली. मुसळधार पाऊस, रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट यातून वाट काढून मकरंद पाटील घटनास्थळी पोचले. गाडीतून उतरून चिखल तुडवत किर्र अंधारात अंगावर पाऊस झेलत मकरंद आबा जागेवर पोचले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या घरातील लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. पहाटे तीन वाजले तरी धो-धो पावसातही त्यांनी कोणतीही तमा न बाळगता मदतकार्य सुरू ठेवले होते. (Wai Landslide MLA Makarand Patil Helped The Kondhavalekar Citizens Trapped In The Landslide bam92)
कोंढावळे येथे घरांवर दरड कोसळून (Kondhavale Village Landslide) काही माणसे अडकलीत, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांना समजली.
कोंढावळे येथे घरांवर दरड कोसळून (Kondhavale Village Landslide) काही माणसे अडकलीत, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांना समजली. त्यांनी कोणताही विचार न करता रात्री नऊ वाजता धो- धो पावसात कोंढावळेकडे धाव घेतली. गावाकडे जाताना रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. मुसळधार पाऊस आबांना थांबवू शकला नाही. जाताना जेसीबी, तहसीलदार, वनविभाग अधिकारी (Forest Department Officer) यांना तातडीने घटनास्थळी जाण्याची सूचना करत होते. वाटेत कोणी स्थानिक प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनाही घटनास्थळी येण्याची सूचना त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) वाई तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले पाटील, वाई पालिकेचे उपाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रमोद शिंदे, बाळासाहेब चिरगुटेंसह कार्यकर्त्यांची टीम रवाना झाली. गाडी घटनास्थळाजवळ पोचत नव्हती. त्यामुळे मकरंद आबा गाडीतून उतरले व चालू लागले. वाटेत प्रचंड चिखल, किर्र अंधार, आभाळ फटल्यासारखा पाऊस. या परिस्थितीला हरवून आबा तेथे पोचले.
जेसीबी चालेना, पोकलेन बोलावला. स्वतः पुढे होऊन काळजीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या घरातील लोकांना त्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने बाहेर काढण्यास सुरवात केली. हे काम रात्रभर सुरू होते. पहाटेचे तीन वाजले. मुसळधार सरी अंगावर झेलत आबा पाय घट्ट रोवून उभे राहिले. कपडेच काय सारे अंग चिखलाने माखले होते. हे मदतकार्य दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू होते. मकरंद पाटील कोंढावळे ग्रामस्थांच्या मदतीसाठी पाय रोवून उभे होते. आज सकाळपासून आबा यांनी देवरुखवाडी येथे घटनास्थळी पुन्हा भेट दिली. तेथे तीन पोकलेन व अनेक ट्रॅक्टर व इतर संसाधन स्वतः चार तास पावसात उभे राहून कामाला लावले. या वेळी त्यांच्यासमवेत उपसभापती भैयासाहेब डोंगरे, गटशिक्षणाधिकारी महामुनी, गटविकास अधिकारी कुसूरकर, केंद्रप्रमुख वैराट, पोतदार व वाशिवली केंद्रातील सर्व शिक्षक, कोंढावळे येथील ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. यानंतर आमदारांचा सर्व ताफा किरोंडे व नंतर जांभळीकडे मदतकार्यासाठी रवाना झाला.
Wai Landslide MLA Makarand Patil Helped The Kondhavalekar Citizens Trapped In The Landslide bam92
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.