Wai Municipality : वाईत बेकायदा होर्डिंगवर कारवाईचा बडगा; 39 होर्डिंग, 15 मोबाईल टॉवर्सना बजावल्या नोटिसा

शहरात लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग व फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
Wai Municipality
Wai Municipalityesakal
Updated on
Summary

शहरातील पालिकेची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक झालेले दहा होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एसटी बस स्थानक आवारातील होर्डिंग्जचा समावेश आहे.

वाई : घाटकोपरमध्ये (मुंबई) झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने धोकादायक होर्डिंग (Hoardings) आणि मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्याचे आदेश सर्व नगरपालिकेला दिले होते. त्यानुसार वाई नगरपालिकेने (Wai Municipality) अनधिकृत होर्डिंग व मोबाईल टॉवर्सवर कारवाईचा बडगा उगारला असून, शहरातील ३९ होर्डिंग्ज व १५ मोबाईल टॉवर्सना बजावल्या नोटिसा बजावल्या आहेत. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी एसटी स्टँड परिसरातील व्यवसायिकांच्या होर्डिंग हटविण्यात आले.

शहरात लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग व फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात विविध होर्डिंगवर कारवाई सुरू आहे. वाई नगरपालिकेच्या वतीने शहरातील चौकाचौकांत लावलेले धोकादायक जाहिरातीचे अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स बोर्डवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत ३९ होर्डिंग व १५ मोबाईल टॉवर्स हटविण्याच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

Wai Municipality
Almatti Dam : 'अलमट्टी धरण' सांगली, कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण; कृष्णा कृती समितीचे महाराष्ट्राला 'हे' आवाहन

शहरातील पालिकेची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक झालेले दहा होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एसटी बस स्थानक आवारातील होर्डिंग्जचा समावेश आहे. किसन वीर चौक, गणपती घाटावर, शिवाजी चौक, एसटी स्टँड परिसरात लावलेल्या जाहिरातीच्या होर्डिंग व फ्लेक्स बोर्डवर कारवाई करण्यात येणार आहे.

Wai Municipality
गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांना ग्रामपंचायतीची नोटीस; 'या' तारखेपासून स्टॉल बंद करण्याचे आदेश, काय आहे कारण?

ही कारवाई अजून दोन दिवस राबविण्यात येणार असून, व्यावसायिकांनी आपले जाहिरातीचे फ्लेक्स स्वतःहून काढून घेण्यात यावेत, असेही आवाहन कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. या मोहिमेत स्थापत्य अभियंता कोमल साबळे, नवीन कांबळे, कुंडलिक लाखे, उमेश कांबळे, वीरेंद्र कांबळे, रोहित गाढवे, योगेश गाडे, राहुल गाडे, चंद्रकांत अडसूळ, अनिल कांबळे, सागर लाड, परेश लाड, महेश लाड, ठेकेदार भूषण चव्हाण यांनी सहभाग घेतला.

वाई शहरात आठ ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने जाहिरातीचे फलक लावण्याची परवानगी आहे. बाकी सर्वच ठिकाणचे होर्डिंग हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमण विभागामार्फत ही कार्यवाही सुरूच ठेवणेत येणार आहे.

-संगीता दळवी, मुख्याधिकारी, वाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.