Satara : 'हा प्रकार त्वरित थांबवा, अन्यथा मुख्यमंत्री-पालकमंत्र्यांविरोधात आत्मक्लेश आंदोलन'

मराठा साम्राज्‍याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याचा देशभर नावलौकिक आहे.
Eknath Shinde Shambhuraj Desai
Eknath Shinde Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

बाळासाहेब देसाई यांच्‍याविषयी सातारकरांना प्रेम आणि आदर आहे. याच अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चौक नामकरण आणि तैलचित्र उभारणीसाठीची बैठक आयोजित केली आहे.

सातारा : पोवई नाका परिसराचे (Satara Powai Naka) नाव केवळ राजकीय दडपशाहीच्या जोरावर बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पायदळी तुडवून नामांतरणाचा घाट घातला जात आहे. ही बाब सातारकरांना बिलकुल मान्य नाही.

Eknath Shinde Shambhuraj Desai
Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीवरुन वाद पेटणार? CM शिंदे म्हणाले, फडणवीस आणि आमच्यात कोणतेही मतभेद..

त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा सातारकरांच्या अस्मितेसाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde), पालकमंत्र्यांविरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्‍याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयास दिला.

Eknath Shinde Shambhuraj Desai
Maharashtra Politics : मोठ्या राजकीय पक्षांना KCR घाम फोडणार; चंद्रशेखर राव यांना हवेत नऊ माजी आमदार!

मराठा साम्राज्‍याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याचा देशभर नावलौकिक आहे. येथील पोवई नाका परिसरातील शिवछत्रपतींचा पुतळा संपूर्ण राज्‍यासाठी प्रेरणादायी आहे. या परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्‍या नावाने चौक तयार करण्‍याचे प्रयत्‍न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

बाळासाहेब देसाई यांच्‍याविषयी सातारकरांना प्रेम आणि आदर आहे. याच अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चौक नामकरण आणि तैलचित्र उभारणीसाठीची बैठक आयोजित केली आहे. पुतळा परिसराच्‍या सुशोभीकरणाचे काम रखडल्‍याबाबत सातारकरांमध्‍ये संताप आहे. त्यातच चौकाच्‍या नामांतराचा मांडण्‍यात येणारा प्रस्‍ताव सातारकरांना मान्‍य होणार नाही.

Eknath Shinde Shambhuraj Desai
Kolhapur Riots : सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी दंगली घडवत आहे; जयंत पाटलांना वेगळाच संशय

याविषयी पूर्वसूचना तसेच हरकती मागवणे आवश्‍‍यक असताना राजकीय दडपशाहीच्या जोरावर हा विषय रेटण्‍यात येत असल्‍याचा सातारकरांचा आरोप आहे. या निवेदनाची दखल न घेतल्‍यास जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करत न्‍यायालयात दाद मागण्‍याचा इशाराही सुशांत मोरे यांनी निवेदनात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.