कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे, त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वाढली आहे.
कऱ्हाड : कऱ्हाड व पाटण तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाण्याच्या पातळीने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे. चोवीस तासात तब्बल दोन टीएमसी पाण्याची आवक धरणात वाढली आहे. सकाळी धरणाची पाणी पातळी ९८.८९ टीएमसी होती.