Satara News : पाण्यासाठी वडूजमध्ये नागरिकांचा रास्ता रोको; आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत

नागरिकांनी तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
satara
satara sakal
Updated on

वडूज : शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने नगरपंचायत प्रशासनाविरोधात आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिकांनी तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

नगरसेविका शोभाताई बडेकर,प्रतिक बडेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकरी चौकात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेवक सुनिल गोडसे, रणजित गोडसे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, डॉ.हेमंत पेठे, डॉ. एन.बी.बनसोडे,अशोक बैले,

संजय गोडसे,प्रदिप खुडे, अजित नलवडे, दाऊदखान मुल्ला, सादिक मुल्ला, सागर भिलारे, महादेव सकट, धनंजय काळे, आनंदा खुडे, दिनकर खुडे, सोमनाथ खुडे, मल्हारी खुडे,प्रदिप वायदंडे, सुनिल भोंडवे, चंद्रकांत खुडे तसेच आदीनाथ नगर, सिध्दार्थनगर, इंदिरानगर तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आज सकाळी शेतकरी चौकात रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली. सकाळी आठ ते साडे दहा अकरा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. नगरपंचायतीच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

यावेळी बोलताना प्रतिक बडेकर म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा.

यावेळी काहींनी मान्यवरांनी नगरपंचायतीच्या पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांनी आंदोलनस्थळी अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाल्याने अखेरीस तहसिलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

श्री. जमदाडे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत त्याठिकाणी उपस्थित असलेले नगरपंचायतीचे कर निरीक्षक अजिंक्य वनमोरे यांना पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे वडूज-कातरखटाव या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या.

पाच रूपये घ्या पण कळशीभर पाणी द्या..

रास्ता रोको दरम्यान आंदोलक चांगलेच संतप्त झाले होते. नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही. गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. आता पाच रूपये घ्या पण आम्हाला कळशीभर पाणी द्या अशी घोषणाबाजी आंदोलक करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.