वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटख्याचा साठा व विक्री व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलीस अधिकारी किंद्रे यांना मिळाली होती.
वाठार स्टेशन (सातारा) : कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, वाठार पोलीस व अन्न-औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत वाठार पोलीस स्टेशन (Wathar Police Station) हद्दीतील पिंपोडे बुद्रुक व पिंपोडे खुर्द या ठिकाणी गुटख्याच्या छाप्यात 12 लाखाच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती वाठार पोलिसांनी दिली.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गुटख्याचा साठा व विक्री व्यवसाय चालू असल्याची माहिती कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांना मिळाली होती. खबरीच्या अनुषंगाने किंद्रे यांनी साताऱ्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग, तसेच वाठार पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पिंपोडे बुद्रुक व पिंपोड खुर्द गावच्या हद्दीत पिंपोडे बुद्रुक येथील जितेंद्र नारायण पवार व दादा नारायण पवार यांच्या किराणा दुकानाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा व पानमसाला असा एकूण २३१,६१८ रुपयाचा माल ताब्यात घेतला. तसेच पिंपोडे खुर्द येथील संतोष भरत कदम यांच्या एक्सयुव्ही-५०० गाडी नंबर एम एच ११ बी व्ही ६७०० मध्ये ९४,०१८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा गाडीसह किंमत रुपये १०,५४,०१८ असा दोन्ही ठिकाणी एकूण १२,८५,६३६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये जितेंद्र पवार व संतोष कदम या दोघांना वाठार पोलिसांनी अटक केली असून दादा पवार हा फरार झाला आहे. सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार कमलाकर कुंभार, साहिल झारी, हेमंत शिंदे, अजय गुरव, श्रीकांत खरात, तुषार ढोपरे, अनिल पवार, आर. आर. शहा यांनी केली असून पुढील तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.