कऱ्हाड - कोयना धरणातुन पाणी सोडताना नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. धरणातुन पाणी येतय म्हणून जादा पाणी सोडू नये. त्यासाठी धऱण व्यवस्थापनाने नियोजन करावे अशा सुचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही यासाठी कर्नाटक सरकारबरोबर मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री समन्वय ठेवुन आहेत असेही त्यांनी स्पष्ट करुन जिल्हयात कुठेही धोकादायक स्थिती नसल्याचे सांगीतले.
पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, प्रदीप पाटील, रणजीत पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, एसटी आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ, बांधकाम विभागाचे अधिकारी चौधरी, यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तालुक्याच्या पुरस्थितीची आढावा दिला. यावेळी त्यांनी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देवुन आवश्यक त्या उपायोजना करण्यात आल्याचे सांगीतले. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी कोयना धऱण व्यवस्थापनाचे अधिकारी पोतदार यांच्याकडुन धरणास्थितीची माहिती घेतली. यावेळी पोतदार यांनी कोयना धरणात सध्या ८३ टीएमसी पाणी असल्याचे सांगीतले.
त्यानंतर मंत्री देसााई यांनी कोयना धरणातुन पाणी सोडताना नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. धरणातुन पाणी येतय म्हणुन जादा पाणी सोडू नये. त्यासाठी धऱण व्यवस्थापनाने नियोजन करावे अशा सुचना केल्या. त्यानंतर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, अल्लमट्टीमुळे सांगली, कोल्हापुरमध्ये पाणी प्रश्न निर्माण होवु नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांशी बोललेले आहेत. अलमट्टीतुन विसर्ग वाढवण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्याला फटका बसणार नाही यासाठी कर्नाटक सरकारबरोबर आम्ही समन्वय ठेवुन आहोत.
ते म्हणाले, पुरस्थितीत प्रशासनाने ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या आहेत. महसुल, आरोग्य, ग्रामविकासह सर्व विभागानी त्याचे नियोजन केले आहे. तालुक्यात पुरेसा औषधसाठा ठेवलेला आहे. कोयनेतुन विसर्ग ३० हजार क्युसेक होत आहे. धोक्याची परिस्थिती जिल्ह्यात नाही. दरड कोसळणे, घरांच्या भिंती पडणे यासारख्या घटना घडत आहेत.
त्याचे तात्काळ पंचनामा करुन तातडीची मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जनतेची या परिस्थितीत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. तहसीलदार विजय पवार यांनी आभार मानले.
शिक्षकांनी शाळेत थांबण्याचे आदेश
पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसामुळे शाळा बंद केल्या होत्या. मात्र पाऊस कमी झाल्याने शाळा सुरु केल्या आहेत असे सांगुण मंत्री देसाई म्हणाले, विद्यार्थी शाळेत आल्यावर ते शाळा सुटल्यावर परत घरी पोहचेपर्यंत शिक्षकांनी शाळा सोडायची नाही असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षक बाहेर पडतात. विदयार्थी घरी पोहचेल नाही तर पालक शिक्षकांना फोन करतात. अशावेळी त्यांना विद्यार्थी कुठे आहेत हे माहिती नसते. त्यामुळे शिक्षकांनी शाळा सोडू नये अशा सुचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.