दहिवडीत निर्भया पथक आहे तरी कुठे?

बस स्थानकात गरज शिस्तीची; पोलिस मदत केंद्र करा कार्यान्वित
Where is  Nirbhaya team in Dahiwadi
Where is Nirbhaya team in Dahiwadi
Updated on

दहिवडी - येथील बस स्थानकातील शिस्तीसाठी डिसेंबर २०१९ मध्ये उभारलेले पोलिस मदत केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय निर्भया पथकाचे अस्तित्वही दिसावे, अशी सामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

येथील बस स्थानकात होणाऱ्या मुलींच्या छेडछाडीला, सैराट दुचाकीस्वारांना आळा घालण्यासाठी, अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच खिसेकापू व भुरट्या चोरट्यांना वचक बसविण्यासाठी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी पोलिस मदत केंद्राची उभारणी केली होती. या केंद्रात महिला पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. मदत केंद्र कोविड काळात वादळी वाऱ्यात उद्‌ध्वस्त झाले. कोविडनंतर आता पुन्हा शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर बस स्थानकात विद्यार्थ्यांचा गजबजाट सुरू झाला आहे. यासोबतच बस स्थानकात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या टवाळखोरांचा वावरसुध्दा वाढला आहे. बसमध्ये बसताना होणारी छेडछाड वाढू लागली आहे.

या सर्वांना आळा घालण्यासाठी व शिस्तीसाठी पोलिस मदत केंद्र पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. निर्भया पथकात महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून या पथकाचे अस्तित्व दिसेल, अशा कामगिरीची अपेक्षा निर्भया पथकाकडून करण्यात येत आहे.

नीलम रासकरांच्या शिस्तीची पुन्‍हा गरज...

बस स्थानकात पोलिस मदत केंद्र सुरू केल्यानंतर येथे कार्यरत असलेल्या पोलिस नाईक नीलम रासकर यांनी शिस्त लावली होती. विद्यार्थिनी रांगेत बसमध्ये बसल्यानंतरच विद्यार्थी बसमध्ये बसत होते. तसेच विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी बंद झाल्या होत्या. यासोबतच बस स्थानकात होणाऱ्या चोऱ्यामाऱ्यांवर नियंत्रण आले होते. ती परिस्थिती पुन्हा येणार का? अशी सामान्यांकडून विचारणा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.