आज (बुधवारी) शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील कोण - कोण पदाधिकारी उपस्थित राहणार? हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Satara Political News : राष्ट्रवादीत (NCP) साहेब अन् दादा असे दोन गट पडल्यानंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील माने हे अजित पवारांचे समर्थक असले, तरी अद्याप त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. शरद पवारांच्या कार्यक्रमासही ते अनुपस्थित होते. अजितदादांकडून त्यांच्यावरच जबाबदारी दिली जाणार, की नवीन जिल्हाध्यक्ष नेमणूक होणार? याची जिल्ह्याला उत्सुकता लागून आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयानंतर पक्षात फूट पडली. शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कोण आणि अजितदादांसोबत कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच दरम्यान, खासदार शरद पवार यांनी कऱ्हाडला येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करून नव्या इनिंगला सुरुवात केली.
तर, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजितदादांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू केल्या. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, दीपक चव्हाण हे दोन आमदार वगळता उर्वरित आमदारांनी आपण साहेबांसोबत असल्याचे दाखवून दिले.
आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत मात्र, आजही दादा की साहेब, अशी द्विधावस्था कायम आहे. शरीराने सर्व जण साहेबांसोबत असले, तरी सर्वांच्या मनात चलबिचल आहे. आज (बुधवारी) शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील कोण - कोण पदाधिकारी उपस्थित राहणार? हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
त्यासाठी पवार साहेबांसोबत असलेल्या आमदारांनी जास्तीतजास्त पदाधिकारी या बैठकीला घेऊन जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. दुसरीकडे अजित पवार यांना मानणारा जिल्ह्यात मोठा गट आहे. सध्या अजितदादांकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नेमण्यात येत आहेत. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीचा साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनील माने हे विद्यमान जिल्हाध्यक्ष असून, ते दादा समर्थक आहेत; पण त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही. त्यामुळे ते अजितदादांसोबत राहिले, तर त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपद राहण्याची शक्यता आहे. सध्यातरी त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात ते दिसले नव्हते. त्यामुळे ते दादांसोबतच राहतील, अशी शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यातील अजितदादांच्या समर्थकांना नवीन पदाधिकारी निवडीत संधी आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून नवीन जिल्हाध्यक्ष निवडला जाणार का? याबाबतही पदाधिकाऱ्यांत संभ्रमावस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.