अधिवेशनानंतर जिल्हास्तरावरील पदाधिकारी निवडले जाणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता आहे.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचा जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी पावसाळी अधिवेशनानंतर (Monsoon Session) होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची चाचपणी सध्या सुरू आहे.
माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते बसून पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीत (Satara Politics) उभी फूट पडली आहे. त्यानंतर अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
त्यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील यांच्यासह प्रत्येक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते दादांच्या गटात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक युवा पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी ताकद देण्याचे काम केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह जुने जाणते कार्यकर्ते राहिले आहेत. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी निवडले गेले आहेत; पण जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कधी निवडले जाणार? याची राष्ट्रवादीच्या गोटात उत्सुकता आहे; पण पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे.
अधिवेशनानंतर जिल्हास्तरावरील पदाधिकारी निवडले जाणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता आहे. त्यासाठी फलटण, वाई, जावळी की माण, खटाव तालुक्यातील कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासाठी माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे कार्यकर्त्यांसह एकत्र बसून पदाधिकारी होण्यास कोण कोण इच्छुक आहेत, त्याची चाचपणी करतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष ठरवला जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष पदासाठी सध्यातरी जिल्ह्यातून सुरेंद्र गुदगे, अमित कदम, नंदकुमार मोरे, युवराज सूर्यवंशी, शशिकांत पिसाळ आदींची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे कोणाला संधी दिली जाणार? हे अजित पवारच ठरवणार आहेत. त्यांच्या मर्जीतलाच जिल्हाध्यक्ष होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.