Satara Politics : 'त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, रामराजे काय आहे हे निवडणुकीपूर्वीच बघायला मिळेल'; NCP नेत्याचा सूचक इशारा

महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढल्या जाणार आहेत.
Ajit Pawar Ramraje Nimbalkar
Ajit Pawar Ramraje Nimbalkaresakal
Updated on
Summary

'उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे जिल्ह्याच्या वतीने शिरवळ येथे जंगी स्वागत केले जाईल.'

सातारा : महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढल्या जाणार असून, त्यानुसारच जागा वाटपाचा निर्णय होईल. युतीत ज्या जागा मिळतील, त्यानुसार काम करावे लागणार आहे. लोकसभा व विधानसभेला तोच पॅटर्न राहणार असून, जिल्ह्यात कोण नको आहे, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा सूचक इशारा माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar) यांनी दिला.

Ajit Pawar Ramraje Nimbalkar
Maratha Reservation : तुमच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा तत्काळ वटहुकूम काढा; सतेज पाटलांचं सरकारलाच चॅलेंज

दरम्यान, रविवारी (ता. १०) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जिल्ह्यात येत असून, त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या रविवारी (ता. १०) कोल्हापूरकडे जाताना साताऱ्यात थांबणार असून, जिल्ह्यात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.

याची माहिती देण्यासाठी आज जिल्हा बॅंकेत माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिन बेलागडे, निवास शिंदे, काकासाहेब गायकवाड उपस्थित होते.

Ajit Pawar Ramraje Nimbalkar
Pankaja Munde : मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी 'ही' समितीचं जबाबदार; पंकजा मुंडेंचा थेट आरोप

रामराजे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे जिल्ह्याच्या वतीने शिरवळ येथे जंगी स्वागत केले जाईल. त्यानंतर त्यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत होईल. कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते कोल्हापूरला मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या लोकांच्या बैठकीला उपस्थित राहतील.

Ajit Pawar Ramraje Nimbalkar
मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण दिल्यास OBC समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही; काँग्रेस नेत्याचा स्पष्ट इशारा

१९९९ ते २००४ या कालावधीत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या कामाचा झपाटा सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सत्कार होईल.’’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकांनी इशारा दिलेला असला तरी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, असे स्पष्ट करून रामराजे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीची संघटना बांधणीची जबाबदारी आमदार मकरंद पाटील व माझ्यावर आहे. जिल्हाध्यक्ष नसतानाही तालुक्यातून कार्यकर्ते या सत्काराला उपस्थित राहतील.’’

Ajit Pawar Ramraje Nimbalkar
देशात मतदान प्रक्रिया पारदर्शकच, कोणत्याही वायरलेस यंत्रणेनं EVM मशिन हॅक करणं अशक्य; मुख्य निवडणूक आयुक्तांचा मोठा खुलासा

माणमध्ये वेगळी भूमिका राहणार का, या प्रश्नावर त्यांनी माणविषयी वेगळी भूमिका घ्यायला तो काय पाकव्याप्त काश्मीर आहे का, असा प्रश्न करून तेथेही युती म्हणूनच काम करणार, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत आमची तिसरी पिढी कार्यरत आहे, असे सांगून शरद पवार व अजित पवार यांच्याविषयी मला अधिक बोलायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ननावरे प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे. खासदार रणजितसिंह यांच्याविषयी ते म्हणाले, ‘‘ते मोठे नेतृत्व आहे, त्यांच्या विषयी मी बोलत नाही. ते कर्तृत्ववान व बुद्धिवान असून, त्यांनी केलेली मागणी पूर्ण होईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar Ramraje Nimbalkar
Kolhapur : महाडिक गटाला मोठा दणका; राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र, शौमिका महाडिकांसह कुटुंबातील दहा जणांचा समावेश

त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू...

माढा, सातारा लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा दबावगट राहणार का?, या प्रश्नावर रामराजे म्हणाले, ‘‘महायुतीच्या माध्यमातून जागा वाटपाचा निर्णय होईल. युतीच्या माध्यमातून ज्या जागा मिळतील त्यानुसार काम करावे लागेल. लोकसभा व विधानसभेला तोच पॅटर्न राहील. जिल्ह्यात कोण नको आहे, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल,’’ असा सूचक इशारा त्यांनी दिला. रामराजे काय आहे, हे निवडणुकीपूर्वी सहा महिने बघायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.