नीरा- देवघरच्या कामाला गती देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कृष्णा- भीमा स्थैर्यीकरणाचे काम लवकरच हाती घेणार
Will speed up work of Neera Deoghar Chief Minister Eknath Shinde
Will speed up work of Neera Deoghar Chief Minister Eknath Shinde
Updated on

फलटण शहर - सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या भेडसावणाऱ्या शेती पाण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नीरा- देवघर व कृष्णा- भीमा स्थैर्यीकरणाकडे बघितले जाते. नीरा- देवघर व कृष्णा- भीमा स्थैर्यीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली.

मुख्यमंत्री शिंदे दरे या आपल्या गावी आले असता त्यांचे स्वागत खासदार निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे व खासदार निंबाळकर यांच्यात मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा व शेती पाण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नीरा-देवघर व कृष्णा-भीमा स्थैर्यीकरणाबाबत माहिती घेऊन नीरा-देवघरचे रखडलेले व उर्वरित कामास मान्यता देऊ. कृष्णा-भीमा स्थैर्यीकरणासंदर्भात विधिमंडळाकडून लवकरच या प्रकल्पाची मान्यता घेऊन दोन्हीही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धोम धरणाचे पुराचे पाणी नदीत सोडून नदीकाठच्या गावातील लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका आणण्याऐवजी त्यातील काही पाणी धोम बलकवडी कालव्यामध्ये सोडण्यात यावे, अशी विनंती खासदार निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली. या संदर्भात त्वरित धोम धरणातून धोम- बलकवडी कालव्यामध्ये पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे धोम धरणाचे पुराचे पाणी कालव्यामध्ये सोडण्यात येणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.