भंगार गोळा करणाऱ्या महिलेने तब्बल दहा तोळ्यांचा राणीहार केला परत; प्रामाणिकपणातून दिली माणुसकीची प्रचिती

Karad City Police : भंगार गोळा करणाऱ्या महिलेसह त्या ज्वेलर्स मालक व त्यांच्या मित्रांचा कऱ्हाड शहर पोलिसांनी सत्कार केला.
Noor Jahan Fakir
Noor Jahan Fakiresakal
Updated on
Summary

नूरजहाँ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अधिकराव पवार यांनी त्यांना खुशीने १० हजार रुपये दिले. त्यासह नूरजहाँ यांच्या सोबतच्या महिलांना साडी देऊन सत्कार केला.

कऱ्हाड : हरतालिका सोडताना चुकून पाण्यात वाहून गेलेला आठ लाख तीस हजार रुपये किमतीचा १० तोळ्यांचा सोन्याचा राणीहार (Gold Necklace) एका भंगार गोळा करणाऱ्या महिलेस सापडला. त्यांनी तो एका ज्वेलर्समध्ये नेऊन दाखवला. ज्वेलर्सच्या मालकानेही तो प्रमाणिकपणे पोलिसात जमा केला. त्यानंतर तो हार गोटे (ता. कऱ्हाड) येथील अधिकराव पवार यांचा असल्याची खात्री करून तो त्यांना परत देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.