लोणंद (जि.सातारा) : वाई, शिरवळ व पाडेगाव येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केलेल्या महिला, लहान मुले व नागरिकांना प्रशासनाकडून कोणत्याच सोयीसुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. त्यांच्यात कमालीची भीती पसरली आहे. पालकमंत्री, आमदार, वाईच्या प्रांताधिकारी व खंडाळ्याच्या तहसीलदारांनी ही बाब गांभीर्याने घेऊन विलगीकरण कक्षात क्वारंटाइन असलेल्यांना सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा या विरोधात उपोषण करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी दिला आहे.
गावभेटी, रोडशो झाले; पण कोरोनावर उपाययोजना शून्य!
पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षाला नुकतीच भेट देऊन तेथील सोयीसुविधांबाबत क्वारंटाइन असलेल्या महिलांशी चर्चा केल्यानंतर श्री. सूर्यवंशी हे लोणंद येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी हर्षवर्धन शेळके-पाटील, प्राजित परदेशी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रेशन दुकानदारांकडून उत्पन्नाची पडताळणी! अजबच प्रकार
श्री. सूर्यवंशी म्हणाले, ""पाडेगाव कक्षात शिरवळसह खंडाळा तालुक्यातील 70 जण दाखल आहेत. त्यात महिलांची संख्या 45 आहे. महिला व लहान मुलांना मुलींच्या, तर पुरुषांना मुलांच्या वसतिगृहात सोय केली आहे. मात्र, येथे 12- 12 तास डॉक्टर, नर्स येत नाही. गरम पाणी, स्वच्छता नाही, साबण, हॅंडवॉश, सॅनिटायझर यापैकी काहीच नाही. तीन दिवस आंघोळीला पाणी मिळत नाही. लहान मुलांना दूध नाही. ज्या खोलीतील रुग्ण पॉझिटिव्ह आला त्या खोलीचे अद्यापही निर्जंतुकीकरण केलेले नाही. अन्य कोणता आजार ओढवला तर सांगायला कोणी माणूस नाही. आम्ही माणसे आहोत. जनावरे नाही. येथे आणून आम्हाला जनावरांसारखे कोंडवाड्यात कोंडून ठेवल्याची खंत व्यक्त करून या महिला प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.'' याबाबत आपण तेथून वाईच्या आपत्ती निवारण प्रमुख अधिकारी तथा वाईच्या प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधून महिलांच्या अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उलट आमच्यावर शंका व्यक्त करत तुम्ही "स्टिंग ऑपरेशन'करता काय? असा सवाल उपस्थित केला. त्यावर आपण त्यांना कृपया "स्टिंग ऑपरेशन'ची भाषा करू नका, असे ठणकावून सांगतानाच "माणसे आमची आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या हाकेला उभे राहाणे हे आमचे कर्तव्य आहे' असे सांगितले. मात्र, एखादा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स कोणी पाठवून या महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या असत्या तर आनंद वाटला असता. मात्र, त्यांनी पोलिसांना पाठवून आम्हाला तेथून बाहेर काढले ही खेदाची बाब असून, प्रशासन अडचणी सोडवण्याऐवजी अडचणी दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही श्री. सूर्यवंशी यांनी केला. दोन दिवसांत सुधारणा न झाल्यास कायद्याच्या 144 कलमाची व अटकेची तमा न बाळगता उपोषण छेडण्याचा इशाराही श्री. सूर्यवंशी यांनी दिला.
भांडवलाला पैसे नाहीत, उद्योग, व्यावसायिक आर्थिक विवंचनेत त्यात बॅंकांचे 'हे' असे वागणे....
श्री. सूर्यवंशी म्हणाले, ""वाई येथील किसन वीर महाविद्यालय, शिरवळ येथील जगताप हॉस्पिटल व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षातही हिच अवस्था आहे. पाचगणी व गीतांजली हॉस्पिटलची व्यवस्था निश्चित चांगली आहे. त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. जिल्ह्यात शिरवळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असताना पालमंत्र्यांनी एकदाही भेट दिलेली नाही. प्रशासकीय अधिकारी उर्मटपणे वागण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा उर्मटपणा जनता कादापिही सहन करणार नाही.'' या विभागाच्या आमदारांनीही आता या सर्व विलगीकरण कक्षांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही या वेळी श्री. सूर्यवंशी यांनी केली.
युवतीची सव्वाकोटींची फसवणूक करणारा भामटा अटकेत, पुणे आरटीओतील नोकरीचे आमिष
भाजपा नेते म्हणतात कोणीही उपाशी राहणार नाही, पण...काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण वाचा
कोरोना झालेला बरा; पण क्वारंटाइन नको!
हर्षवर्धन शेळके- पाटील म्हणाले, ""पाडेगाव विलगीकरण कक्षातील असुविधांबाबत कोणावर ताशेरे ओढायचे नाहीत. मात्र, तेथील असुविधा पाहिल्यावर कोरोना झालेला बरा; पण क्वारंटाइन नको म्हणण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे. वाळीत टाकल्यासारखी त्यांची अवस्था झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने यामध्ये त्वरित सुधारणा करावी.''
याबाबत प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विलगीकरण कक्षात आवश्यक त्या सर्व सुविधा देत आहाेत. रुग्णांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर आम्ही त्यांचे निकट सहवासितांना विलगणीकरण कक्षात आणताे. संबंधितांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही.
संपादन - सिद्धार्थ लाटकर
'या' उपक्रमशील शिक्षकांचे संजय भागवतांनी केले कौतुक; 'सकाळ'च्या पुस्तकात स्थान
टोमॅटोनं तारलं, कांद्यानं रडवलं अन् लॉकडाउननं मारलं!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.