ढेबेवाडी (जि.सातारा) : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या दारूबंदी मोहिमेचे काय झालं ? असा सवाल मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथे आयोजित ऑनलाइन ग्रामसभेत महिलांनी केला. गावात महिलांसाठी स्वतंत्र वाचनालय, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही सभेत करण्यात आली.
काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमही बदलली
मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ढेबेवाडीच्या परिसरात दोन परवानाप्राप्त दारू दुकाने आणि तीन बिअर बार असून, संपूर्ण दारूबंदीसाठी वर्षभरापासून महिलावर्ग आग्रही आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत सध्या विविध पातळ्यांवर पाठपुरावाही सुरू आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या ऑनलाइन ग्रामसभेत सरपंच अमोल पाटील व ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे हे ग्रामपंचायत कार्यालयातून तर सदस्या रत्नमाला धस, दीपाली पाटील, नीलम सुतार, विजया जौंजाळ यांच्यासह अन्य महिला मोबाईलव्दारे ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या.
गँगस्टर एजाज लकडावालाला कोरोनाची लागण, जीटी रुग्णालयात दाखल
महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. दारूबंदीबाबत आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. गावात महिलांसाठी स्वतंत्र वाचनालय, सॅनिटरी नॅपकीन मशिन, बचत गटांना बैठकीसाठी हॉल आदी सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. जलशुद्धीकरण, जंतुनाशक फवारणी, कोरडा दिवस पाळणे, नाले सफाई, आरोग्य तपासणी, कोरोना विषयक जनजागृती आदींबाबत चर्चा करण्यात आली. सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच सुचवलेल्या उपाययोजना व मागण्या ग्रामपंचायतीमार्फत मार्गी लावण्याचे आश्वासन सरपंच पाटील यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील 'या' गावात घरगुती गणेशाेत्सवच, मंडळांचा एकमुखी निर्णय
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.