वाह, क्या बात है! जावळीत महिलांनी सुरू केली स्वस्त धान्य दुकानं

Jawali Taluka
Jawali Talukaesakal
Updated on

करहर (सातारा) : जावळी तालुक्यात (Jawali Taluka) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानाने (Maharashtra State Rural Campaign) महिला सबलीकरणात दिशादर्शक काम केले असून एकाचवेळी महिगाव, केळघर, हुमगाव, आखाडे येथे स्वस्त धान्य दुकाने (Grain Shop) सुरू करून आदर्श घालून दिला आहे. महिला आता जशा गावकारभारी होत आहेत, तशाच त्या उद्योगिनी होण्याकडेही वाटचाल करत आहेत. (Women Started Grain Shops In Jawali Taluka Satara Marathi News)

Summary

जावळी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानाने महिला सबलीकरणात दिशादर्शक काम केले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत (उमेद) तालुका अभियान कक्षातर्फे एकाचवेळी महिगाव, केळघर, हुमगाव, आखाडे येथे स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली असून, उमेद बचत गटातील (Women Self-help Group) महिला त्याचे काम पाहत आहेत. नुकतेच या दुकानांचे उद्‌घाटन हुमगाव येथे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) तसेच महिगाव येथे प्रांताधिकारी, सभापती जयश्री गिरी (Speaker Jayshree Giri) यांच्या हस्ते करण्यात आले.

Jawali Taluka
'शिवभोजन'ला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ; साताऱ्यात दोन लाख गरीब 'शिवभोजन'मुळे तृप्त!

या उपक्रमासाठी सभापती जयश्री गिरी, उपसाभापती सौरभ शिंदे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष काम करत आहे. तालुका व्यवस्थापक नीलेश भोसले, प्रभाग समन्वयक संगीता शिंदे, आल्पेश खरात, औदुंबर नावडकर तसेच प्रेरिका ज्योती पवार, मीना भोसले, स्वप्नाली शिंदे, प्रमिला शेलार, सुवर्णा बेलोशे आदी समूहांचे कामकाज पाहत आहेत. 'उमेद'अंतर्गत बचत गटांना फिरता निधी, तसेच अर्थसाह्य उपलब्ध करण्यात आले असून अभियानातून उपजीविका निर्मितीसाठी रेशनिंग दुकाने (Ration shop) सुरू करण्यात आली आहेत.

Women Started Grain Shops In Jawali Taluka Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.