रहिमतपूर (सातारा) : इंटरनेटचा (Internet) वापर करून सुर्ली (ता. कोरेगाव) येथील दिलीप विठ्ठल भोसले (वय 67) (Dilip Bhosale) यांनी इंटरनेट व वाचनाचा वापर करून होम मेड इलेक्ट्रिक सायकल (Electric Bicycle) बनावली असून, एकदा चार्ज केली की, ही सायकल 15 ते 20 किलोमीटर धावते. ही सायकल बनवण्यासाठी त्यांना फक्त आठ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या सायकलने कोणतेच प्रदूषण होत नाही. पेट्रोलची (Petrol) बचत व पायंडलवर चालत असल्याने व्यायामही होतो. (World Bicycle Day After 67 Years Dream Come True Invented Electric Bicycle In Eight Thousand Rupees Satara Positive News)
स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतंही वय नसतं, हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यातीलच एक म्हणजे दिलीप भोसले!
स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतंही वय नसतं, हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यातीलच एक म्हणजे दिलीप भोसले! वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. इंटरनेटवर युट्युबचा (YouTube) वापर करून त्यांनी जुन्या सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित केले. ज्या सायकलच्या सोबतीने त्यांनी आपल्या जीवनात बरेच चढ-उतार पाहिले ती सायकल जुनी झाली होती; परंतु भोसलेंच्या स्वप्नातून सायकलला ही नवीन ऊर्जा मिळाली. बॅटरीवर फिरणारी सायकल घरीच बनवायची व आपल्या जुनीच सायकल त्यासाठी वापरायचे हे त्यांनी पाहिलेले स्वप्न.
भोसले हे पेंटर म्हणून प्रसिद्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक विषयाशी त्यांचा काहीही संबंध नसला तरी आवड होती. वाचनाची आवड असल्याने ते रहिमतपूर येथे हिंद वाचनालयात नेहमी सायकलवरून येत. वाचनातून काही माहिती घेताना युट्युबचा वापर करत त्यांनी घरगुती इलेक्ट्रॉनिक सायकल बनवण्याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याला लागणारे साहित्य, मोटार, बॅटरी आदीबाबत माहिती पूर्ण झाल्यावर त्यांनी इलेक्ट्रिक सायकल तयार करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन इलेक्ट्रिक सायकल किट मागवले. सिंगल सीटसाठी 24 व्होल्टची बॅटरी व 250 व्हॅटची मोटर वापरली आहे.
ही सायकल 80 किलो वजनापर्यंत चालते व एकदा चार्ज केली, की साधारणपणे 15 ते 20 किलोमीटरपर्यंत चालते. बॅटरी संपल्यानंतर पायंडलचा वापर करूनही सायकल चालवता येते. त्याचबरोबर कोणतेच प्रदूषण होत नाही.
-दिलीप भोसले, रहिमतपूर
World Bicycle Day After 67 Years Dream Come True Invented Electric Bicycle In Eight Thousand Rupees Satara Positive News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.