World Water Day 2021 : "हर घर नल से जल' जलजीवन मिशनची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती : विनय गौडा

World Water Day 2021 : "हर घर नल से जल' जलजीवन मिशनची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती : विनय गौडा
Updated on

सातारा : जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या "जलजीवन मिशन'मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून 100 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
 
श्री. गौडा म्हणाले, """नळजोडणीचे उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी 100.39 टक्के इतकी आहे. जलजीवन मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना असून त्यामध्ये राज्य आणि केंद्राचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे. 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतिव्यक्ती रोज किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. "हर घर नल से जल' असे घोषवाक्‍य घेऊन 2020-21 पासून जलजीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सर्व परिस्थितीत शाश्वत पद्धतीने मिळावा, असे मोठे उद्दिष्ट जलजीवन मिशनचे आहे.'' 

फलटणात विनामास्क फिरणाऱ्या 48 जणांवर दंडात्मक कारवाई

या उद्दिष्ठानुसार सातारा जिल्ह्याने 2020-21 चे उद्दिष्ट मिळाल्यानंतर सर्व पातळ्यांवर यंत्रणा कार्यान्वित केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग यांनी काटेकोर नियोजन केले. तालुका पातळीवर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अशा सर्वच घटकांनी याबाबत योग्य नियोजन केले. ग्रामीण जनतेचीही उत्कृष्ट साथ मिळत आहे. त्यामुळे 100 टक्के उद्दिष्टप्राती झाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबास वैयक्तिक नळजोडणी मिळावी, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, हे व्यापक उद्दिष्ट आहे. याच प्रकारे दरवर्षी काटेकोर नियोजन करून 100 टक्के उद्दिष्टपूर्ती केली जाईल. 

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.