दरड कोसळण्यामुळे एक दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा : सातारा शहरात पावसाचा जोर (Heavy Rain in Satara) वाढत असताना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास यवतेश्वर घाटात (Yavateshwar Ghat) अचानक दरड कोसळली. त्यामुळे घाटातील दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली.
यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून, पर्यटनासाठी कास (Kas Pathar), बामणोलीला गेलेले पर्यटक वरच अडकून राहिले आहेत. प्रशासनाने दरड हटविण्याचे काम हाती घेतले होते. यवतेश्वर घाटामध्ये रात्री पावसाचा जोर वाढल्याने येथील पॉवर हाऊसपासून दुसऱ्या वळणावर डोंगरकड्यावरून रस्त्यावर भले मोठे दगड आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
या घाटात छोटे मोठे झरे वाहत असल्याने येथील रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे येथील काही ठिकाणी मातीचा भराव मोठे दगड कोसळून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या जाग्यावरच थांबून वाहतुकीची कोंडी झाली. पॉवर हाऊस परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या घटनेचे वृत्त कळताच सातारा तालुका पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मदत कार्यासाठी रवाना झाली आहे. या दरड कोसळण्यामुळे एक दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या डोंगर परिसराचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.