क्रेझी किया रे... "हा" टॅटू आर्टिस्ट ठरतोय युवकांत "हिट"

क्रेझी किया रे... "हा" टॅटू आर्टिस्ट ठरतोय युवकांत "हिट"
Updated on

सातारा : जीवनातील काही खास आठवणी जतन करुन ठेवण्यासाठी एखादा सुंदरसा टॅटू काढून घ्यावा, असे अनेक जण ठरवतात. हल्ली टॅटूची लोकप्रियता वाढत आहे. टॅटू ही एक कला आहे हे मान्य करण्यापर्यंत आपला समाज पोहचला हाच एक मोठा बदल आहे. अन्यथा कला म्हणून त्याचा विचार पूर्वी कुणी केला नसता; पण आता दिवस बदलले आणि टॅटूची क्रेझ वाढली. बॉलिवूड हॉलिवूडचे काही स्टार्स, त्यांचे टॅटू, क्रिकेटपटूंचे टॅटू यांच्यामुळे ही कला जनसामान्यांपर्यंत पोहचली. पूर्वी गोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे अथवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती आणि आजही कायम आहे.

Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी
 
माझी स्वतःची टॅटूशी ओळख झाली तीही अशीच, वेगळ्याच वळणानं ! मला लहानपणापासूनच स्केचेस करण्याची, चित्रकलेची आवड होती. त्यामुळे अभ्यासात मन कधीच लागले नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर पुढे शिकायचे नाही, असं ठरवून टाकलं आणि घरच्यांना तसं सांगूनही टाकलं; पण त्यांनीही शिकणार नाही तर पुढे काय, कसे होईल म्हणून मला कधीही टोमणे मारले नाहीत हे महत्वाचं! कोणतीही कला जगण्याचं बळ देत असते. केवळ अपेक्षा असते ती शाब्बासकीची. आज आपण विविध कला पाहतो आणि अनुभवतो देखील असे सातारा जिल्ह्यातील वाईतील कृष्णा मोहन पातुगडे सांगता हाेता. कृष्णाची संघर्षमय कहाणी एेकून युवा वर्ग थक्क हाेताे आणि त्याचे कलेचे काैतुक करताे.

Video : जावळीतील पांडवकालीन मरडेश्वर शिवलिंग

टॅटू व्यवसाय हा खास करुन मोठ-मोठ्या शहरातच चालतो. ग्रामीण भागात या व्यवसायाला फारसं महत्व प्राप्त नाही. त्यामुळे हा व्यवसाय उभं करण्यात कृष्णा पातुगडे यास अनंत अडचणींना सामोरे जावं लागलं, परंतु कलाकाराकडे कोणतीही कला असली की, ती कला त्याला उच्च शिखरावर नेऊन पोहचवते. फक्त, त्या कलाकाराने त्या कलेवर निस्सीम प्रेम असणे आवश्‍यक आहे. लहानपणापासूनच कृष्णाला कलेची निस्सीम आवड, त्यामुळे त्यांच्या अंगी विविध कला अवगत होत्या. यामध्ये चित्रकला, पेन्सिलीपासून कलाकृती तयार करणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तुंची निर्मिती करणं अशा नानाविध कला त्याने जोपासल्या होत्या. एखादी टाकाऊ वस्तू दिसली की, त्याची सुंदर कलाकृती बनवायची यात त्यांचा हातखंडा होता. चित्रकला, पेन्सिला आत्मसात करत त्याचा हात टॅटूकडे वळला. सुरवातीला कृष्णाला यात फारसे यश प्राप्त झाले नाही. ही कला अवगत करण्यासाठी मग त्याने पुण्यात क्‍लास लावायचे ठरवले; पण तिथेही त्याची फसगत झाली. तरीही त्याने हार मानली नाही. पुढे जोमाने त्याने ही कला स्वतःच्या हिंमतीवर प्राप्त केली.

लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?  

तद्नंतर साता-यात त्याने टॅटू काढण्याचा व्यवसाय सुरु केला. पहिल्यांदा त्याच्या पदरी निराशा आली. त्यातून उभारी घेत पुन्हा संधी दवडली आणि त्यात मात्र कृष्णा चमकला. आज साता-यात कृष्णाच्या हातून टॅटू काढण्यासाठी लोक त्याला शोधत येतात. याचे प्रमुख कारण म्हणजे सातारा जिल्ह्यात त्याने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्याच्या कलेत श्री गणेश, श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज याबरोबरच इतरही चित्रांचा समावेश पहायला मिळतो. सध्यस्थितीत चित्रकला, पेन्सिल कला याचे महत्व कमी होत असताना कृष्णाने ही कला आत्मसात करुन युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणात तुम्ही कमी पडला तरी निराश होऊ नका, तुमच्याकडे असलेल्या कला कौशल्याच्या माध्यमातून मोठे यश मिळवा असे कृष्णा सांगतो. 

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

सातारा : अध्यक्ष... बाप्पांचा उत्सव जवळ आलाय, हे वाचा

सामाजिक संदेश देण्यासाठीही टॅटूचा वापर 

कला ही प्रत्येकाच्या अंगी असते. मात्र, ती प्रत्येकाने जागृत करणे गरजेचे आहे. गोंदणे अर्थात शरीरावर कधीही न मिटवता येणारे नक्षीकाम किंवा अक्षरलेखन करणे, ही कला भारतात तशी जुनी आहे. पूर्वीच्या काळी लहान वयातच मुलींच्या कपाळावर टिकली लावण्याच्या ठिकाणी गोंदवले जात होते किंवा नवविवाहितेच्या हातावर पतीचे नाव गोंदवण्याची पध्दत होती. कालांतराने ही पध्दत काहीशी मागे पडली. पण, हे होत असताना टॅटू ही नवी कला प्रचलित होऊ लागली. टॅटूज हा आताच्या तरुण मुला-मुलींमध्ये आकर्षणाचा विषय बनला आहे. बहुतेक वेळेला तरुण-तरुणी कायमस्वरुपी टॅटू काढून घ्यायला येतात, तर बरेच जण हौस म्हणून किंवा उत्सुकता म्हणून टॅटू काढायला येतात. शरीर रंगवण्याची कला अनेकांना भुरळ घालते. तरुणाई टॅटूच्या सध्या प्रेमात आहे. अंगावर टॅटू मिरवण्यासाठी हजारो रुपये मोजायलाही तयार आहे. केवळ स्टेटससाठी नव्हे, तर सामाजिक संदेश देण्यासाठीही टॅटूचा वापर केला जातो असे कृष्णा मोहन पातुगडे याने नमूद केले.

अपंगत्वावर केली मात, त्या कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()