सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत या प्रकाराला शिक्षण विभागच पाठीशी घालत असल्याचा गौप्यस्फोट सदस्य अरुण गोरे यांनी केला. यावरून सदस्यांनी शिक्षण विभागाला अक्षरशा धारेवर धरले. यासोबतच अनिवास थोरात, भीमराव पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनीही शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही सभा ऑनलाइन झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे त्याचबरोबर अन्य अधिकारी होते. प्रत्येक पंचायत समितीतून जिल्हा परिषद सदस्य व सभापती ऑनलाइन सहभागी झाले होते.
मोबाईलला नेटवर्क द्या अन्यथा टॉवर काढून न्या, ग्रामपंचायतीने कळविले कंपनीला
मानसिंगराव जगदाळे यांनी दुखवट्याचे ठराव मांडल्यानंतर सातारा शहराची हद्दवाढ आणि पुष्कर मंगल कार्यालयात कोविड रुग्णालय उपलब्ध करून दिल्याबद्दल सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. याच वेळी जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख यांनी हद्दवाढीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. यावर खंडाळा पंचायत समितीच्या सभापतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
...अखेर माजी सैनिकांच्या लढ्यास यश; महाविकासने घेतला माेठा निर्णय
ऑनलाईन सभा वादळी होईल, असे वाटत नव्हते. मात्र, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच्या विषयी सदस्य अरुण गोरे यांनी गौप्यस्फोट करून बारा शिक्षकांच्या बदल्यावर आक्षेप घेतला. गेल्या वर्षी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शाळा खोली दुरुस्तीसाठी निधी आला असून, तो अजून खर्च झालेला नाही. कऱ्हाड तालुक्यातील पाचवड वस्ती शाळा पुरात वाहून गेल्याने मुले जनावरांच्या शेडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन वेळा याबाबत पत्र दिल्यानंतरही शिक्षण विभागाने काहीच केले नाही. त्यांना काम नाही म्हणून ते पत्र देतात का..? संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या बदलीचा ठराव घ्या, अशी मागणी निवास थोरात यांनी केली.
सातारा : मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर आमदारांच्या 'या' आहेत भावना
फलटण तालुक्यातील कापशी शाळेच्या दुरवस्थेची तक्रार धैर्यशील अनपट यांनी केली. या वेळी शाळा खोल्यांसाठी 3.42 कोटी शिल्लक असताना त्याचा निधी खर्च का होत नाही, असे नमूद करताच सभापती जगदाळे यांनी पैसेच उपलब्ध नसल्याचा दावा केला. उदयसिंह पाटील यांनी पाचवड वस्ती शाळेबाबत कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान, अरुण गोरे यांनीही पैसे का खर्च झाले नाहीत, अशी विचारणा करत आपत्कालीनचे पैसे एक वर्षापासून खात्यावर असून, मनोज पवार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिल्यानंतरही त्याचे पुढे काय झाले, याची विचारणा केली. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही. मात्र, गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी उत्तर दिल्याशिवाय बैठक पुढे चालणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी निधीची माहिती दिली. यावर कोणाचेही समाधान झाले नाही. परिणामी शिवाजी सर्वगोड यांनीही संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
कऱ्हाडच्या पोलिस उपाधीक्षकांनाही कोरोनाची लागण; कुटुंबातील चौघांचा समावेश
तालुकास्तरावर कोरोना केअर सेंटर..!
आरोग्य विभागावरील चर्चेत तालुकास्तराव कोरोना केअर सेंटर उभारण्याची मागणी झाली. यासाठी चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचीही सूचना झाली. त्यानुसार जिल्हा परिषद तालुकास्तरावर कोरोना केअर सेंटर उभारणी करण्याबाबत सकारात्मक्ता दर्शविण्यात आली. बांधकाम विभागालाही लक्ष्य करण्यात आले. येथील अधिकारी कामच करत नसून ते कोणालाच सहकार्य करत नसून त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत, असा आरोप राजाभाऊ जगदाळे यांनी केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.