Best Smartphones: OnePlus ते Moto... 'हे' आहेत २०२२ मधील बेस्ट स्मार्टफोन्स, किंमत २५ हजारांपेक्षा कमी

२०२२ मध्ये २५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या लिस्टमध्ये मोटो, सॅमसंगच्या हँडसेटचा समावेश आहे.
Smartphone
SmartphoneSakal
Updated on

Best phones under Rs 25000: २०२२ मध्ये भारतीय बाजारात अनेक चांगले स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. रियलमी, सॅमसंग, ओप्पोसह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सने यावर्षी बाजारात एंट्री केली आहे. भारतीय ग्राहकांकडून देखील २५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सला चांगला प्रतिसाद मिळतो. वर्ष २०२२ मध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या २५ हजारांच्या बजेटमधील स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

iQOO Z6 Pro 5G
iQOO Z6 Pro 5G

iQOO Z6 Pro 5G

iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन एकापेक्षा एक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ९० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, एचडीआर१० प्लस सपोर्ट, ६६ वॉट चार्जिंग सपोर्टसह ४७०० एमएएचची दमदार बॅटरी सारखे फीचर्स मिळतात. यात स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे.

OnePlus Nord CE 2 5G

२५ हजारांच्या बजेटमझ्ये येणाऱ्या OnePlus Nord CE 2 5G ला देखील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. फोनमध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले, MediaTek Dimensity 900 SoC, ६५ वॉट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी सारखे दमदार फीचर्स मिळतील. फोनच्या ६GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. मात्र, ऑफरसह २० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Smartphone
Electric Cars: कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार शोधताय? 'ही' लिस्ट पाहून त्वरित कराल खरेदी
Redmi K50i 5G
Redmi K50i 5G

Redmi K50i 5G

रेडमीच्या या फोनची सुरुवाती किंमत २४ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी, १४४ हर्ट्जसह येणारा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनला वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी५३ रेटिंग मिळाले आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे.

Moto G82 5G

मोटोच्या या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतात. फोनमध्ये ६.६ इंच १०-बिट pOLED डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. याशिवाय, ५००० एमएएचची दमदार बॅटरी, अँड्राइड १२ ओएस मिळेल. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे.

Realme 9 Pro+ 5G
Realme 9 Pro+ 5G

Realme 9 Pro+ 5G

Realme 9 Pro+ मध्ये ५० मेगापिक्सल Sony IMX766 OIS प्रायमरी कॅमेरा, ९०हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, MediaTek Dimensity ९२० SoC, ६० वॉट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. ऑफरचा फायदा मिळाल्यास फोन फक्त २१ हजारात तुमचा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.