Smartphones
SmartphonesSakal

Best Smartphones: २०२२ मध्ये १५ हजारांच्या बजेटमधील 'हे' फोन्स ठरले सुपरहीट, फीचर्स एकदा पाहाच

वर्ष २०२२ मध्ये १५ हजारांच्या बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन्सला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मोटोरोलो, सॅमसंगचे फोन्स यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहिले.
Published on

Best Smartphones Under rs 15000: २०२२ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. यावर्षात स्मार्टफोन सेगमेंटमध्ये देखील अनेक नवनवीन प्रयोग पाहायला मिळाले. २०२२ मध्ये भारतीय बाजारात अनेक चांगले स्मार्टफोन्स देखील लाँच झाले आहेत. खासकरून, १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सला ग्राहकांची पसंती पाहायला मिळाली. भारतात ५जी नेटवर्क उपलब्ध झाल्याने ग्राहक ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. यावर्षात ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या १५ हजारांच्या बजेटमधील टॉप-५ स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

iQOO Z6 Lite 5G

२०२२ मध्ये iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनला सर्वाधिक पसंती मिळाली. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon ४ Gen १ प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.६८ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. तर पॉवर बॅकअपसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. विशेष म्हणजे कंपनी या ५जी फोनवर सॉफ्टवेअर अपडेट देखील देत आहे. यामुळे तुम्हाला लेटेस्ट फीचर्स वापरता येतील.

Samsung Galaxy M13 4G

१०,७४९ रुपये सुरुवाती किंमतीत येणाऱ्या सॅमसंगच्या या फोनला देखील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाले आहे. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी, ६.६ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले, Exynos 850 चिपसेट सारखे अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. फोनसोबत बॉक्समध्ये १५ वॉटचा चार्जर देखील मिळतो. फोटोग्राफीसाठी शानदार कॅमेरे देखील यात मिळतात. कमी किंमतीत येणारा हा फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

Smartphones
Power Bank: भन्नाट! बाजारात आले हटके डिव्हाइस, आता चक्क उन्हात चार्ज होणार स्मार्टफोन-लॅपटॉप

Moto G42

तुम्ही जर १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला फोन शोधत असाल तर Moto G42 चा विचार करू शकता. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा शानदार एमोलेड डिस्प्ले, ५००० एमएएचची दमदार बॅटरी, स्टेरिओ स्पीकर सारखे फीचर्स मिळतील. पाण्यापासून सुरक्षेसाठी फोनला आयपी५२ रेटिंग मिळाले आहे.

Poco M4 5G

पोकोच्या या फोनची सुरुवाती किंमत १०,९९९ रुपये आहे. खूपच कमी किंमतीत येणारा हा शानदार ५जी स्मार्टफोन आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट, ५००० एमएएचची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. तसेच, चित्रपट-सीरिजचा आनंद घेण्यासाठी ६.५८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल.

Realme 9i 5G

कमी किंमतीत हटके फीचर्ससह येणाऱ्या रियलमीच्या या फोनने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये ५००० एमएएचच्या दमदार बॅटरीसह ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. रियलमीच्या या डिव्हाइसमध्ये तुम्हाला इतरही शानदार फीचर्स मिळतील. दरम्यान, तुम्ही जर १५ हजारांच्या बजेटमध्ये येणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वरील हँडसेट्सचा नक्कीच विचार करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()