TVS ने लाँच केलं स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा किंमत अन् फीचर्स

TVS ने लाँच केलं स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा किंमत अन् फीचर्स
Updated on

इलेक्ट्रिक स्कूटर्सना वाढती मागणी पाहाता TVS ने आज 2022 iQube इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने हे 3 व्हेरिएंट 10 रंग पर्याय आणि 140 किमीच्या जबरदस्त रेंजसह बाजारात आणले आहे. TVS iCube iCube, iCube S आणि iCube ST या तीन व्हेरिएंटमध्ये हे स्कूटर लॉंच करण्यात आले आहे.

या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची दिल्लीतील ऑन-रोड किंमत 98,654 रुपयांपासून सुरू होते. बंगलोरमध्ये ऑन-रोड किंमत 1,11,663 रूपयांपासून सुरू होते. मिड व्हेरिएंट iQube S ची किंमत दिल्लीत 1,08,690 रुपये आहे, तर बेंगळुरूमध्ये 1,19,663 रुपये आहे. जरी कंपनीने टॉप-ऑफ-द-लाइन 2022 iQube ST च्या किमती जाहीर केल्या नाहीत.

TVS च्या अधिकृत वेबसाईटवर TVS iCube आणि TVS iCube S चे बुकिंग सुरु झाले आहे. या मॉडेल्सची डिलिव्हरीही सुरू झाली आहे. दोन्ही स्कूटर 33 शहरांमध्ये उपलब्ध आहेत आणि लवकरच 52 अतिरिक्त शहरांमध्ये लॉन्च केल्या जातील. TVS iQube ST अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुकिंग करता येते. TVS iQube ST च्या डिलिव्हरीसह अनेक तपशील कंपनी लवकरच देईल.

TVS ने लाँच केलं स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा किंमत अन् फीचर्स
राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटकेच्या आदेशानंतर प्रतिक्रिया, म्हणाला..

TVS iCube इलेक्ट्रिक स्कूटर 7 इंच TFT टचस्क्रीन, क्लीन UI, इन्फिनिटी थीम पर्सनलायझेशन, व्हॉईस असिस्ट, अलेक्सा स्किलसेट, इंट्यूटिव्ह म्युझिक प्लेअर कंट्रोल, OTA अपडेट, प्लग-अँड-प्ले कॅरी विथ चार्जर, फास्ट चार्जिंग, सेफ्टीबद्दल माहिती, ब्लूटूथ आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी पर्याय, 32 लिटर स्टोरेज स्पेस सारख्या फीचर्ससह येते.

TVS iQube ST

टॉप-ऑफ-द-लाइन प्रकार, TVS iQube ST 5.1 kWh बॅटरी पॅकसह येतो आणि हे स्कूटर 140 किमीची रेंज देते. TVS iQube ST 7-इंचाची TFT टच स्क्रीन 5-वे जॉयस्टिक इंटरॅक्टिव्हिटी, म्युझिक कंट्रोल्स, वाहनांच्या हेल्थसह प्रोएक्टिव्ह नोटिफिकेशन, 4G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेट्ससह येते. स्कूटर थीम पर्सनलायझेशन, व्हॉईस असिस्ट आणि अलेक्सा स्किलसेटसह येते. TVS iQube ST चार नवीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि 1.5kW फास्ट-चार्जिंग आणि 32L अंडर-सीट स्टोरेज देखील यामध्ये देण्यात आले आहे.

TVS ने लाँच केलं स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा किंमत अन् फीचर्स
Realmeचे शानदार स्मार्टफोन आज होणार लाँच; उत्कृष्ट कॅमेरा, जलद चार्जिंगसह अनेक फिचर्स

TVS iQube S

TVS iQube S व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 3.4 kWh बॅटरी मिळते जी पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी पर्यंत जाते. TVS iCube S 7-इंच टीएफटी, इंटरेक्शन. म्युझिक कंट्रोल, थीम पर्सनलायजेशन, प्रोअॅक्टिव्ह नोटिफिकेशनसह व्हेकल हेल्थ यासारखे फीचर्स यामध्ये मिळतात, हे स्कूटर देखील चार करल ऑप्शन्समध्ये येते.

TVS iQube

TVS iQube च्या बेस व्हर्जनमध्ये 3.4 kWh ची बॅटरी जी पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी रेंज देते. यात 5-इंचाचा TFT टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्ट देण्यात आले आहे. TVS iQube चे बेस व्हेरिएंट देखील तीन कलर पर्यायांसह येते. यामध्ये नेव्हिगेशन सिस्टम, टेलिमॅटिक्स युनिट, अँटी थेफ्ट आणि जिओफेन्सिंग यासरखे फीचर्स मिळतात.

TVS ने लाँच केलं स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा किंमत अन् फीचर्स
Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.