Biggest Data Breach : टेलिग्राम, लिंक्डइन, एक्स अशा कित्येक अ‍ॅप्सचा डेटा लीक! 2600 कोटी फाईल्स सायबर गुन्हेगारांच्या हाती

सायबरन्यूजच्या सुरक्षा रिसर्चर्सने याबाबत माहिती दिली आहे. या हल्ल्याला 'मदर ऑफ ऑल ब्रीचेस' म्हटलं जात आहे. गुन्हेगारांनी चोरलेल्या डेटाची साईज ही तब्बल 12 टेराबाईट्स आहे.
Biggest Data Breach
Biggest Data BreacheSakal
Updated on

Mother of Data Breach : आजच्या काळात डेटा ही सगळ्यात महागडी गोष्ट झाली आहे. त्यामुळेच सायबर गुन्हेगार वेबसाईट्स आणि अ‍ॅप्सचा डेटा चोरण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. एखाद्या वेबसाईटचा डेटा लीक होणं ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मात्र आतापर्यंत झालेला सर्वात मोठा डेटा लीक आता समोर आला आहे. विविध लोकप्रिय वेबसाईट्सच्या तब्बल 26 बिलियन फाईल्स लीक झाल्या आहेत.

सायबरन्यूजच्या सुरक्षा रिसर्चर्सने याबाबत माहिती दिली आहे. या हल्ल्याला 'मदर ऑफ ऑल ब्रीचेस' म्हटलं जात आहे. गुन्हेगारांनी चोरलेल्या डेटाची साईज ही तब्बल 12 टेराबाईट्स असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एक टेराबाईट्स म्हणजे 100 GB, यावरुन या डेटाच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते.

कोणकोणत्या अ‍ॅप्सचा समावेश?

कोणत्या अ‍ॅप किंवा वेबसाईटचा किती डेटा लीक झाला आहे याबाबत या रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.

  • एक्स (ट्विटर) - 281 मिलियन रेकॉर्ड्स (X Data Leak)

  • लिंक्डइन (Linked In) - 251 मिलियन रेकॉर्ड्स

  • अ‍ॅडोब (Adobe) - 153 मिलियन रेकॉर्ड्स

  • कॅनव्हा (Canva) - 143 मिलियन रेकॉर्ड्स

  • ड्रॉपबॉक्स (Dropbox) - 69 मिलियन रेकॉर्ड्स

  • टेलिग्राम (Telegram) - 41 मिलियन रेकॉर्ड्स

  • डेलीमोशन (Daily Motion) - 86 मिलियन रेकॉर्ड्स

  • मायस्पेस (MySpace) - 360 मिलियन रेकॉर्ड्स

  • वेईबो (Weibo) - 504 मिलियन रेकॉर्ड्स

  • डीझर (Deezeer) - 258 मिलियन रेकॉर्ड्स

  • अडल्ट फ्रेंड फाईंडर (Adult Friend Finder) - 220 मिलियन रेकॉर्ड्स

  • व्हीके (VK) - 101 मिलियन रेकॉर्ड्स

  • टेन्सेंट क्यूक्यू (Tencent QQ) - 1.4 बिलियन रेकॉर्ड्स

Biggest Data Breach
आशियामध्ये सर्वाधिक सायबर अटॅक होणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; हल्ल्यांमध्ये 15 टक्क्यांची वाढ - रिपोर्ट

कोणता डेटा झाला लीक

या डेटामध्ये यूजर्सचे लॉगइन डीटेल्स तर आहेतच, मात्र त्यासोबत अन्य गोपनीय आणि खासगी माहितीचाही समावेश आहे. या 12 TB डेटामध्ये 3,800 फोल्डर्स आहेत. यातील प्रत्येक फोल्डरमध्ये वेगवेगळा डेटा आहे. आयडेंटिटी थेफ्ट, फिशिंग, सायबर हल्ले आणि इतर कित्येक प्रकारच्या चुकीच्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. (Biggest Data Breach in History)

असा तपासा तुमचा डेटा

तुमचा पर्सनल डेटा लीक झाला आहे की नाही हे तुम्ही स्वतःच तपासू शकता. यासाठी तुम्हाला 'Have I Been Pawned' या वेबसाईटची मदत घ्यावी लागेल. याठिकाणी तुमचे काही डीटेल्स दिल्यानंतर, ते इंटरनेट किंवा इतर ठिकाणी लीक झाले आहेत का हे सांगितलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.