35 android apps with dangerous alware found in google play store delete installed it
35 android apps with dangerous alware found in google play store delete installed it

Google Play वर आहेत 35 धोकादायक अ‍ॅप, फोनमधून त्वरित अनइंस्टॉल करा

Published on

गुगल प्ले स्टोअरमध्ये मालवेअर असलेले अ‍ॅप्स रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात, परंतु काही वेळा स्कॅमर मालवेअर-संक्रमित अ‍ॅप्स प्ले स्टोअरमध्ये इंजेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मार्ग वापरतात. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी कंपनी बिटडेफेंडरनुसार, 35 लोकप्रिय अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये धोकादायक मालवेअर आढळले आहेत. आता, तुमच्या फोनवर त्यापैकी काही असल्यास, ते त्वरित हटवा.

सायबर सुरक्षा संशोधकांच्या एका टीमला असे 35 अॅप सापडले आहेत जे लाखो Android वापरकर्त्यांच्या डिव्हाइमध्ये मालवेअर पसरवत आहेत. रोमानियामधील एका सायबर सुरक्षा तंत्रज्ञान कंपनीच्या रिपोर्टनुसार Google Play Store वर एक नवीन मालवेअर कॅम्पेन चालवले जात आहे. ज्यामध्ये काही अ‍ॅप्सवापरकर्त्यांना ते इंस्टॉल करवून घेण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत आहेत. अशा अ‍ॅप्सकडून नाव बदलून तसेच सतत जाहिराती दाखवून फसवणूक केली जातेय. हे Google Play वर पैसा तर कमवत तर आहेतच त्यासोबतच युजर एक्सपिरीएंस देखील खराब करत आहेत.

20 दशलक्षाहून अधिक डाउनलोड

उपलब्ध झालेल्या सार्वजनिक डेटाच्या आधारे, Bitdefender च्या अहवालात असे नमूद केले आहे की या 35 मलिशियस अ‍ॅप्सना Google Play Store वर एकूण दोन दशलक्षाहून अधिक डाउनलोड केले आहेत. हे Android वापरकर्त्यांना प्रथम ते इंस्टॉल करण्यास प्रवृत्त करतात आणि इंस्टॉलनंतर लगेच, ते त्यांचं नाव, आयकॉन बदलून डिव्हाइसवर आपली उपस्थिती लपवून ठेवतात.

यानंतर हे अ‍ॅप्स अग्रेसिव्ह जाहिराती दाखवू लागतात. वापरकर्त्याला गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांची उपस्थिती लपविण्यासाठी ते भिन्न नाव वापरत असल्याने, एप्लिकेशन शोधणे आणि अन इंस्टॉल करणे कठीण आहे. रिपोर्टमध्ये असेही आढळून आले की अनेक वैध अ‍ॅप्स त्यांच्या वापरकर्त्यांना जाहिराती दाखवतात, ते त्यांच्या स्वतःच्या स्ट्रक्चरनुसार जाहिराती दाखवतात, याचा अर्थ ते त्यांच्या त्यांच्या वापरकर्त्यांना इतर प्रकारचे मालवेअर देखील देऊ बनवतात

बर्‍याच वेळा, वापरकर्त्यांना App आवडत नसल्यास ते काढून टाकू शकतात. वापरकर्ते देखील मलिशीयस अ‍ॅप्स इच्छेनुसार काढून टाकू शकतात, परंतु त्याचे डेव्हलपर्स अशा अॅप्स प्रभावित डिव्हाइसेसवर शोधणे अधिक कठीण करतात. Bitdefender अहवालात असे नमूद केले आहे की हे सापडलेले मलिशीयस अ‍ॅप्स एका नवीन रीयल टाईम बिहेवियर टेक्निकचा वापर करत आहेत. हे तंत्रज्ञान धोकादायक प्रक्रिया पार पाडण्यासाठी डिजाईन करण्यात आले आहे.

35 android apps with dangerous alware found in google play store delete installed it
Jio vs Airtel : दररोज 1GB डेटा देणारे प्लॅन, फोन चालू ठेवण्यासाठी आहेत बेस्ट

यूजर्स हे अ‍ॅप्स कसे टाळू शकतात

असा धोका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गरज नसलेले अ‍ॅप्स इंस्टॉल न करणे. तुम्ही वापरत नसलेले अ‍ॅप्स देखील तुम्ही काढून टाकावे. अशा अ‍ॅप्स तपासून पाहा ज्यात मोठ्या संख्येने डाउनलोड्स आहेत आणि कमी किंवा कोणतेही रिव्ह्यूज नाहीत.

अशा Apps ची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

  1. Walls light - Wallpapers Pack

  2. Big Emoji - Keyboard

  3. Grad Wallpapers - 3D Backdrops

  4. Engine Wallpapers - Live & 3D

  5. Stock Wallpapers - 4K & HD

  6. EffectMania - Photo Editor

  7. Art Filter - Deep Photoeffect

  8. Fast Emoji Keyboard

  9. Create Sticker for Whatsapp

  10. Math Solver - Camera Helper

  11. Photopix Effects - Art Filter

  12. Led Theme - Colorful Keyboard

  13. Keyboard - Fun Emoji, Sticker

  14. Smart Wifi

  15. My GPS Location

  16. Image Warp Camera

  17. Art Girls Wallpaper HD

  18. Cat Simulator

  19. Smart QR Creator

  20. Colorize Old Photo

  21. GPS Location Finder

  22. Girls Art Wallpaper

  23. Smart QR Scanner

  24. GPS Location Maps

  25. Volume Control

  26. Secret Horoscope

  27. Smart GPS Location

  28. Animated Sticker Master

  29. Personality Charging Show

  30. Sleep Sounds

  31. QR Creator

  32. Media Volume Slider

  33. Secret Astrology

  34. Colorize Photos

  35. Phi 4K Wallpaper - Anime HD

35 android apps with dangerous alware found in google play store delete installed it
मारुतीची नवीन Alto K10 लाँच; देते 25km मायलेज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()