Maruti Suzuki : देशातली सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुजुकी बाजारात आपल्या बेस्ट ब्रॅंड असलेल्या Swift आणि Dzire चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच लॉंच करते आहे. अर्थात दोन्हीही गाड्यांची वेगळी ओळख करुन देयची गरज नाही. त्यात नवीन टेक्निकस नक्की काय असणार आहेत यावर सगळ्यांचच लक्ष रोखून आहे. मीडिया रिपोर्टस नुसार, पुढच्या वर्षापर्यंत बाजारात या गाड्या लॉंच करतील.
Maruti Swift च्या नवीन मॉडेलला कंपनी 2024च्या पहिल्या सहा महिन्यात लॉंच करु शकते. असं म्हणता आहेत की, या कारच्या इंजिनची क्षमता वाढवत 1.2 लीटरच्या क्षमतेचे स्ट्राँग हायब्रिड इंजिन यात वापरले जावू शकते. या इंजिनला Z12E असे कोडनेम दिले गेले आहे. हे इंजिन कारच्या हायर व्हेरियंट मध्ये असू शकते असा अंदाजा आहे. ही टेक्निक या आधी मारुती सुजुकीच्या ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रुजर हाइराइडर मध्ये देखील वापरली गेलेली.
40 km चा मायलेज मिळेल...
सुझुकी आणि टोयोटा यांच्या करारानुसार, दोन्ही वाहन उत्पादक त्यांचे वाहन प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर करतात. याच आधारावर अनेक वाहनेही बाजारात दाखल झाली आहेत. जसे बलेनो-ग्लांझा, ब्रेझा-अर्बन क्रूझर, ग्रँड विटारा-हायराइड इ. Grand Vitara आणि Hyride या देशातील सर्वात भारी हायब्रिड कार आहेत ज्या 27.97 kmpl पर्यंत मायलेज देतात. स्विफ्ट आणि डिझायर त्यांच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे आणि कमी वजनामुळे 35 ते 40 kmpl मायलेज देतील अशी अपेक्षा आहे. पण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
किंमत काय असेल?
नवीन अपडेट्स आणि तंत्रज्ञानामुळे या दोन्ही कारच्या किमतीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे, मारुती सुझुकी नेहमीच त्यांची किंमत चांगली ठेवण्याचा प्रयत्न करते. असे मानले जात आहे की कंपनी 7.50 लाख रुपयांच्या किमतीत देऊ शकते. सध्याच्या मारुती स्विफ्टची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 8.98 लाख रुपयांपर्यंत जाते. तर डिझायरची किंमत 6.44 लाख ते 9.31 लाख रुपये आहे. या दोन्ही कार पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी प्रकारात उपलब्ध आहेत आणि मायलेजच्या बाबतीत आधीच प्रसिद्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.